जालना जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी

महेश गायकवाड
सोमवार, 6 जानेवारी 2020

निवडी आधी आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली असून सतीश टोपे यांना पुन्हा उपाध्यक्षपद मिळवण्यासाठी राजेश टोपे प्रयत्न करत असलयाची चर्चा  

जालना-  जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाची सोमवारी (ता.6 ) निवड प्रक्रिया पूर्ण झाली. या निवडणुकीत भाजपने सहभाग न घेतल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारांची अध्यक्ष व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

अध्यक्षपदासाठी भाजपकडून  निर्धारित वेळेत दोन्ही पदासाठी एकही अर्ज सादर न केल्याने शिवसेनेचे उत्तम वानखेडे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे महेंद्र पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रीया घेण्यात आली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उत्तम वानखेडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. भाजपकडून उपाध्यक्ष पदासाठीही अर्ज दाखल न केल्यामुळे राष्ट्रवादी कडून पूजा सपाटे यांनी दाखल केलेला अर्ज माघारी घेतला. महेंद्र पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

हेही वाचा अमित देशमुख लावणार का सांस्कृतिक धोरण मार्गी

दरम्यान उपायध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून पूजा सपाटे, शिवसेनेकडून महेंद्र पवार यांचा अर्ज आला होता. दुपारी दोन वाजता निवड होणार होती. निवडी आधी आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली असून सतीश टोपे यांना पुन्हा उपाध्यक्षपद मिळवण्यासाठी राजेश टोपे प्रयत्न करत असलयाची चर्चा झाली, मात्र, ती हवेत विरली.

वाचा - असा मिळवला राष्ट्रवादीने विजय
शिवसेनेने जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत महा आघाडी करत भाजपला सर्वाधिक जागा मिळवुनही सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न केले होते. या प्रयत्नांत महाविकास आघाडीला यश आले.

तत्कालीन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे बंधू अनिरुद्ध खोतकर अध्यक्ष, तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे बंधू सतीश टोपे उपाध्यक्षपदी विराजमान झाले होते. सध्या भाजप 22, शिवसेना 14, राष्ट्रवादी 13, काँग्रेस 5 व अपक्ष 2 असे बलाबल होते.

अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते. या पदावर सेनेचे उत्तम वानखेडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांनी स्वतः सभागृहा बाहेर येऊन याबाबत सांगितले. 

क्लिक करा - पुतळे उभारले, विचारांच्या पेरणीचे काय
त्यानंतर अध्यक्षपदासाठी भाजपकडून निर्धारित वेळेत दोन्ही पदासाठी एकही अर्ज सादर झाला नाही. त्यामुळे शिवसेनेचे उत्तम वानखेडे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे महेंद्र पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivSena Mahavikas Aghadi Wins Jalna Zilla Parishad Jalna News