Uddhav thackeray
Uddhav thackeray Sakal
मराठवाडा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालाची घोषणा; परभणीकरांचा संघर्ष आला फळाला...!

गणेश पांडे

परभणी - परभणीकरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी संघर्षाची धार अधिक तिव्र केल्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीची घोषणा केली. प्रदिर्घ संघर्षाचे फलित म्हणून परभणीकरांच्या पदरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पडले. याचा परभणीकरांनी आनंद व्यक्त करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार मानले. खरे तर हा तमाम परभणीकर आणि सर्वपक्षिय नेत्यांच्या नेतृत्वाचा विजय म्हणावा लागेल.

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे असी मागणी गेल्या अनेक वर्षापासून सुरु होती. परंतू तीन-चार वर्षापुर्वी जिल्हा तेथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या घोषणेनंतर केंद्राच्या एका समितीने येथील शासकीय रुग्णालय व तेथील सुविधांचा आढावा घेऊन सकारात्मक अहवाल सादर केला होता. प्रश्न होता तो जागेचा परंतु त्यातून मार्ग काढल्यामुळे परभणीकरांच्या अपेक्षांना घुमारे फुटले होते, आशा पल्लवीत झाल्या होत्या.

परंतु, त्यानंतर वेळेचा अपव्यय होत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळणार की नाही अशी धुसर स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर टिमटिमणाऱ्या या ज्योतीला हवा देण्यासाठी सलग पाच ते सहा दिवस धरणे आंदोलन केले. त्यामध्ये सर्वपक्षीय नेते मंडळींचा सहभाग असावा, याचा त्यांनी कसोसीने प्रयत्न केला होता. त्यानंतर मात्र कोरोनाने उग्र रुप धारण केले व वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मागे पडला. त्यानंतर उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रक्रीया सुरु झाली परंतु परभणीकरांच्या अपेक्षांना मात्र तडा जात असल्याचे लक्षात येताच खासदार संजय जाधव यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली. त्यासाठी यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षिय नेत्यांची एकत्र मोट बांधत या मागणीला परत एकदा उभारी देवून संघर्षाला सुरुवात केली.

सप्टेंबर महिण्याच्या सुरुवातीपासूनच खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा परभणीकरांनी जनआंदोलन सुरु केले. विशेष म्हणजे या आंदोलनात खासदार संजय जाधव यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणण्याचे मोठे काम पूर्ण करून आंदोलनात उतरविले. पक्षीय मतभेद, विचार बाजूला सारुन परभणीकर या एकाच छत्राखाली त्यांनी बहुतांश जणांना आणण्यात यश मिळवले. त्यामुळे आंदोलनाची धार अधिकच धारदार झाली. सुरुवातीला स्वाक्षरी मोहिमेने या आंदोलनाची सुरुवात झाली व त्यानंतर मात्र सर्व समाज घटकाला एकत्र घेऊन धरणे आंदोलने केली.

इकडे धरणे आंदोलन सुरु असतात शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पीपीपी चे धोरण जाहिर केले. या शासनाच्या निर्णयाने आंदोलनात तेल ओतण्याचे काम केले. शासनाविरोधात जनक्षोभ निर्माण झाला. नागरीकांच्या भावनांची दखल घेऊन खासदार श्री. जाधव यांनी प्राणांतीक उपोषण करण्याची घोषणा केली. या लढ्यात त्यांच्यासोबत जिल्ह्यातील शिर्ष नेतेमंडळी खांद्याला खांदा लावून होती. परभणीचे आमदार डॉ.राहूल पाटील, पाथऱीचे कॉग्रेसेच आमदार सुरेश वरपुडकर, राष्ट्वादी कॉग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार सुरेश देशमुख यांच्यासह इतर पक्षाचेही नेते आंदोलनात सक्रीयपणे उतरले होते.

वरीष्ठ व सहकारी लोकप्रतिनिधींच्या आग्रहाची दखल घेऊन खासदार श्री. जाधव यांनी प्राणांतिक उपोषण रद्द केले. मुंबई येथे शिष्टमंडळासह जाऊन परभणीकरांची भूमिका मांडली. त्याचा परिपाक म्हणून की काय जिल्हयाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मंजुरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी (ता.१७) औरंगाबाद येथे केली.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखील गेल्या 30-32 वर्षापासून शिवसेनेच्या पाठीशी असलेल्या जिल्ह्यातील नागरीकांच्या भावनांची दखल घेतल्याचे दिसून येते. सोबतच सर्व पक्षाच्या नेतेमंडळींची साथ मिळाल्याने त्यांचे हे काम अधिकच सुकर झाले.

प्रतिक्रिया -

परभणी शहरासह जिल्ह्याची वेगळी ओळख देशाच्या नकाशावर व्हावी हा संकल्प आम्ही सर्वपक्षिय नेत्यांनी केला होता. तो संकल्प आज पूर्ण झाला आहे. परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करण्याची घोषणा केल्या बद्दल मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार मानतो. शेतकरी, शेतमजुरांचा हा जिल्हा असल्याने या ठिकाणी आरोग्याची शासकीय यंत्रणा सक्षम असणे गरजेचे होते. आमची गेल्या अनेक वर्षांची मागणी आज पूर्ण झाली आहे, त्याचा मनस्वी आनंद होत आहे.

- संजय जाधव, खासदार, परभणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding Collapse: काळजात धडकी भरवतात ते १७ सेकंद; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा दुसरा VIDEO आला समोर

Indian Economy : भारत २०२५ पर्यंत चौथी अर्थव्यवस्था ; जी-२० शेर्पा व निती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांचा विश्वास

SAKAL Exclusive : संवेदनशील प्रकरणांत भाजपचे मौन धोकादायक; राष्ट्रीय काँग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांचे मत

Lalu Yadav : जहानाबाद लोकसभेच्या जागेवरुन लालू यादवांचं टेन्शन वाढलं; आरजेडीच्या बंडखोराचा उमेदवारी अर्ज...

Latest Marathi News Live Update : मुंबई होर्डिंग दुर्घटनेचे देशभरात पडसाद, रायपूर महानगरपालिकेचे मोठे पाऊल

SCROLL FOR NEXT