मराठवाडा

Video: शासकीय कार्यालयाचे दरवाजे बंद

गणेश पांडे

परभणी : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजना म्हणून शासकीय कार्यालयाचे दरवाजे बंद ठेवण्यात आले आहेत. बुधवारी (ता.१८) जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल या दोन  कार्यालयाचे मुख्य दरवाजे बंद ठेवण्यात आले होते. कामाचे स्वरूप पाहूणच अभ्यागतांना कार्यालयात सोडले जात होते.

राज्यात ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव वाढत जात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या आगोदरच नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे. ज्या ठिकाणी गर्दी जमते अशी ठिकाणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात चित्रपट गृह, उद्यान, मॉल, सुपरशॉपी, मंगल  कार्यालये, लॉन्स, गर्दी असणारी मंदीरे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन हव्या त्या उपाय योजना करण्यास सुरुवात करत आहे. 

कार्यालयाबाहेर अभ्यागंताची गर्दी ​
याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयात ही लोकांनी गर्दी करू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी (ता.१८) जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयाचे मुख्य द्वार बंद करण्यात आले. ज्या व्यक्तींचे अत्यावश्यक काम असल्यास त्याला कार्यालयात सोडले जात आहे. तहसिल कार्यालयाचे दरवाजे बंद असल्याने या कार्यालयाबाहेर अभ्यागंताची गर्दी जमली होती. तहसिल कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून गर्दी करू नका... आवश्यक काम असल्यासच कार्यालयात प्रवेश दिला जाईल असे आवाहन केले जात होते.

तहसिल कार्यालयात विशेष कक्ष
परभणी तालुक्यामध्ये ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण राखणे आवश्यक आहे. त्यासाठी तहसिल कार्यालय परभणी येथे कक्ष स्थापन करण्यात आले आहे. यावर उपाययोजना म्हणून परभणी तालुक्यातील तालुकास्तरावरील सर्व शासकीय, निमशासकीय इत्यादी कार्यालयाच्या ठिकाणी अत्यंत निकडीच्या व अत्यावश्यक कामा शिवाय नागरिकांनी जाण्याचे टाळावे तसेच फारच अत्यावश्यक काम असल्यास मेलव्दारे किंवा दुरध्वनी (क्र.०२४५२-२२२७११) वर संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार विद्याचरण कडवकर यांनी केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rule: घेतलेलं कर्ज परत नाही केलंत? तर तुमचा फोन लॉक होईल, आरबीआयकडून नवा नियम आणण्याची तयारी

लई भारी! दुर्मिळ आजारने त्रस्त असलेल्या बाळाला जॅकलिनची मदत, उचलला शस्त्रक्रियेचा खर्च, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Updates Live : ज्येष्ठ काँग्रेस नेते, केरळ विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि केपीसीसीचे माजी अध्यक्ष पी. पी. थानकाचन यांचे निधन

Sinnar News : सिन्नर एमआयडीसीत नवीन अग्निशमन बंब दाखल, उद्योगांना मोठा दिलासा

Beed Crime : हुंड्यासाठी अजून एक बळी; गेवराईच्या २२ वर्षीय नवविवाहितेने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT