governor bhagat singh koshyari sakal
मराठवाडा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतले परळी येथील वैद्यनाथाचे दर्शन

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शुक्रवारी बीड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.

प्रविण फुटके

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शुक्रवारी बीड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.

परळी वैजनाथ (जि. बीड) - राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शुक्रवारी (ता.१९) जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. दुपारी अंबाजोगाईत त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण मंडळ व रेड क्रॉस सोसायटी यांच्या अधिकाऱ्यासमवेत बैठक घेतली. योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे पूजन करून दर्शन घेतले.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शुक्रवारी अंबाजोगाई येथून दुपारी चार वाजण्याच्या सुमारास येथे दाखल झाले. ४.२० मिनीटांनी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाची पूजा, आरती करून श्रावण पर्वकाळात प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने राज्यपालांचा सत्कार करण्यात आला. वैद्यनाथाची प्रतिमा देऊन राज्यपालांचा देवस्थान कमिटीने सत्कार केला. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजेश देशमुख, प्रा. प्रदीप देशमुख, प्रा. बाबासाहेब देशमुख, विजयकुमार मेनकुदळे, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, नंदकिशोर जाजू, नागोराव देशमुख, रघुवीर देशमुख, जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT