hingoli dhanyasatha 
मराठवाडा

हिंगोलीत अडकलेल्या परप्रांतीयांसाठी लातुरातून धान्यसाठा 

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडकलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी मदत म्‍हणून प्रादेशिक अधिकारी, महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळ लातूर यांच्याकडून धान्य, खाद्यतेलाचा पुरवठा करण्यात आला असून हा धान्यसाठी नगरपालिकेकडे उपलब्ध झाला आहे. हे धान्य परप्रांतीय गरजूपर्यंत पोचविले जाणार असल्याचे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे व मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले.

महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळ, लातूर यांच्याकडून परप्रांतीय लोकांसाठी हिंगोली नगरपरिषदेला धान्य सामुग्री देण्यात आली आहे. स्‍वतंत्र वाहनातून गहू, तांदूळ, तुरडाळ व खाद्यतेल उपलब्ध झाले आहे. यात गहू ७६० किलोग्रॅम, तूरडाळ ४५० किलोग्रॅम, चनाडाळ ७५० किलोग्रॅम, तांदूळ १३५० किलोग्रॅम, तेल ३०० लिटर असे साहित्य नरपरिषदेकडे उपलब्ध झाले आहे. 


धान्यसामुग्री नगरपरिषद कार्यालयात सुरक्षित
जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सदरील साहित्य स्‍वीकारून हिंगोली येथे अडकलेल्या परप्रांतीय लोकांना पोचविण्याचे नियोजन केले आहे. दरम्‍यान, हे साहित्य प्राप्त होताच तामिळनाडू येथील हिंगोलीत अडकलेले मावीन पंडी परिस्‍वामी या परप्रांतीय व्यक्‍तीस तसेच त्‍यांच्यासोबत असलेल्या नागरिकांसाठी २५० किलो तांदूळ, २० लिटर खाद्यतेल, ५० किलो तूरडाळ, अशी धान्यसामुग्री वितरित करण्यात आली. तसेच लातूर येथून आलेली उर्वरित धान्यसामुग्री हिंगोली नगरपरिषद कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात आली आहे. 

गायत्री शक्‍तिपीठला टप्प्याटप्प्याने देणार साहित्य 
शहरातील गायत्री शक्‍तिपीठला टप्प्याटप्प्याने आवश्यकतेप्रमाणे देऊन त्‍यापासून भोजन तयार करून सदर भोजन हिंगोली येथे अडकलेल्या परप्रांतीय लोकांना देण्याबाबत नियोजन करण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे व मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले. नागरिकांनी अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नये, संचारबंदीचा भंग करू नये, या कलावधीत घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लाभार्थींना रेशन धान्याचे वाटप
कनेरगाव नाका : हिंगोली तालुक्‍यातील कनेरगाव नाका येथे दोन दिवसांपासून लाभार्थींना स्वस्त धान्याचे वाटप करण्यात येत आहे. कनेरगाव नाका येथे एकूण ६८० लाभार्थी आहेत. त्यात पाच सर्वसाधारण, ८६ अंत्योदय, बीपीएल व अन्नसुरक्षाअंतर्गत ४७२, तर ११७ शेतकरी लाभार्थी आहेत. सध्या सर्वसाधारण व शेतकरी लाभार्थी वगळता इतर लाभार्थींना एका महिन्याचे रेशन वाटप सुरू आहे. यात अंत्योदय लाभार्थींसाठी २३ किलो गहू, बारा किलो तांदूळ व एक किलो साखर लाभार्थींना देण्यात आली. तर बीपीएल व अन्नसुरक्षा लाभधारकांना प्रतिव्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ चे वाटप करण्यात आले. शुक्रवारपर्यंत (ता.तीन) ८६ अंत्योदयपैकी ७५, तर ४२३ लाअन्नसुरक्षा लाभार्थींना धान्याचे वाटप करण्यात आल्याचे स्‍वस्‍तधान्य दुकानदार रामहरी भालेराव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT