hingoli
hingoli hingoli
मराठवाडा

धान्य चोरी करणारी टोळी जेरबंद; १२ लाखांचा मुद्देमालही जप्त

राजेश दार्वेकर

हिंगोली: हिंगोली व विदर्भामध्ये घरफोडी करून धान्य चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. यामध्ये त्यांच्याकडून १२ लाखांचा मुद्देमालही जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने सोमवार (ता. २६) पत्रकार परिषदेत दिली. हिंगोली जिल्ह्यात २७ एप्रिल रोजी बासंबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत खानापूर येथील दुकानाचे कुलूप तोडून त्यातील तुरीचे १८ कट्टे चोरून नेले होते. यासंर्भात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर कळमनुरी, बाळापूर, हिंगोली ग्रामीण येथे सुद्धा काही काळाच्या अंतराने अशाच प्रकारे दुकानाचे कुलूप तोडून धान्य चोरून नेल्या संदर्भाने गुन्हे दाखल झाले होते.

ही चोरीची मालिका चालूच होती. परंतु आरोपीचा सुगावा लागत नसल्याने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, यांनी सदर गुन्हे उघड करण्यासाठी सहायक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांना सूचना देऊन उपनिरीक्षक शिवसाब घेवारे, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक नेमले. त्या अनुषंगाने घेवारे यांनी सदर गुन्हा बारकाईने अभ्यास करून सायबर गोपनीय माहितीच्या आधारे अकोला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला व ४० घरफोडी व चोरीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी हसन उर्फ इंमी निगमुम्बाला, गवळीपुरा कारंजा (जि . वाशिम) येथे ताब्यात घेतले.

अधिक चौकशी केली असता त्याचे साथीदार फेरोजखान पठाण (रा. कारंजालाड), व मोईन उर्फ अन्सा चांद लगे (रा. कारंजा) यांच्या मदतीने हिंगोली ग्रामीण हद्दीतील गंगानगर, बासंबा हद्दीतील खानापुर, कळमनुरी, बाळापुर, येथे एकूण पाच दुकानाचे शटरचे कुलूप तोडून तुर व सोयाबीन चोरून नेल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपीस अटक करून गुन्ह्यात वापरलेली झायलो कार व चोरी गेलेले धान्य असे १३ लाख रूपायांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हे उघड केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT