gram panchayat election voting
gram panchayat election voting 
मराठवाडा

Gram Panchayat Election: सरपंचपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष; पुढील आठवड्यात सोडत

शिवशंकर काळे

जळकोट (जि.लातूर):  तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी (ता.२९) रोजी दुपारी तीन वाजता उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. ही माहिती निवडणूक नायब तहसीलदार राजा खरात यांनी दिली आहे.

गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता जळकोट तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीची सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. संबंधित गावच्या प्रतिनिधी समोर या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. तालुक्यातील ४७ ग्रामपंचायती पैकी २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तालुक्यातील मुदत संपलेल्या २७ ग्रामपंचायती अंतर्गत प्रभाग रचना, प्रभाग निहाय आरक्षण, मतदार याद्यांचे काम टाळेबंदीच्या अगोदरच पूर्ण झाले असून टाळेबंदी मुळे ही प्रक्रिया स्थगित झाली होती.

मात्र आता निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करून निवडणुकीपूर्वी आरक्षणाची सोडत काढली होती मात्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ही सोडत रद्द केली होती. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी शुक्रवारी (ता.२२) रोजी आदेश काढून  तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी (ता.२९) काढण्याचे निर्देशित केले आहे.

उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली जळकोटचे तहसीलदार संदीप कुलकर्णी  यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित गावचे लोकप्रतिनिधींनी समोर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. गावपातळीवर निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतीचे अनेक ग्रामस्थ या सरपंचपदाच्या आरक्षणाच्या सोडतीकडे लक्ष ठेवून होते. तालुक्यातील आरक्षणाची सोडत कधी होईल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या ग्रामस्थांची प्रतीक्षा आता संपली आहे.

(edited by- pramod sarawale)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

Harshaali Malhotra: 'बजरंगी भाईजान' मधली मुन्नी आठवते? आता ओळखणंही झालंय कठीण, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT