jalkot gp 
मराठवाडा

Gram Panchayat Election: जळकोटमधील ४३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

शिवशंकर काळे

जळकोट(लातूर): तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीच्या सन २०२० ते २०२५ साठीच्या सरपंचपदाचे आरक्षण उपजिल्हाधिकारी प्रवीण मेगशेट्टी यांच्या उपस्थित तहसीलदार संदीप कुलकर्णी यांनी ता.२९ रोजी जाहिर केले. अनुसूचीत जाती राखीव, व अनुसूचीत जमाती प्रवर्गासाठीचे आरक्षण पूर्वीप्रमाणे ठेवण्यात आले आहेत.

अनुसूचीत जाती राखीव प्रवर्गासाठी सोनवळा, कोनाळी डोंगर, होकर्णा, पाटोदा बु,घोणसी, मरसांगवी, असे एकुण सहा ग्रामपंचायती आहेत. अनुसूचित जाती महिलासाठी ढोरसांगवी, कुणकी, केंतसिंदगी, मंगरुळ, वडगाव, तर अनुसूचीत जमाती प्रवर्ग राखीव प्रवर्गासाठी हावरगा, मागास प्रवर्ग राखीव पुरुषासाठी लाळी बु, उमरगा रेतू, धामणगाव, शेलदरा, एकुर्गा खुर्द, येवरी, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी तिरुका, रामपुरतांडा, लाळी खुर्द,उमरदरा, हाळदवाढवणा, पाटोदा खुर्द

खुला प्रवर्गसाठी राखीव असलेल्या बेळसांगवी, सुल्लाळी, चेरा, अतनुर, बोरगाव खुर्द, शिवाजीनगर तांडा, गव्हाण, वांजरवाडा, कंरजी 
खुला  महिलासाठी विराळ, गुत्ती, येलदरा, डोंगरगाव, माळहिप्परगा, जगळपुर, कोळनुर, मेवापुर, चिचोली, रावणकोळा, आदि ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण झाले.

दरम्यान यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पूर्ण झाल्याने सत्तावीस ग्रामपंचायतीच्या गावकऱ्यांची काही दिवसांत निवड होणार आहे. तालुक्यातील वडगाव ता.जळकोट येथे निवडून आलेल्या सदस्यापैकी एकही अनुसूचीत जातीची महिला निवडून आली नसली तरी येथील सरपंचपदाचे आरक्षण हे अनुसूचीत जाती महिला राखीव करता सुटलेली आहे. तालुक्यातील अनेक गावच्या ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जैसे थे असून तुरळक गावचे सरपंच पदाचे आरक्षणात बदल झाला आहे.तालुक्यातील ४३ पैकी २१ ग्रामपंचायतीवर महिला सरपंच होणार आहेत.

आरक्षण सोडतीसाठी गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे,नायब तहसीलदार राजा खरात,रऊफ शेख,अजीम शेरवाले,युवराज करेप्पा आदिची निवड करण्यात आली.गणपत कोकणे या सात वर्षाच्या मुलाच्या हाताने काही गावच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.कार्यक्रमास तालुक्यातील नवनिवार्चीत सदस्य, नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT