gram panchayat officials in bribe case add name to the seniority list beed sakal
मराठवाडा

सेवा जेष्ठता यादित नाव समाविष्ट करण्यासाठी पैशांची मागणी...

ग्रामंपचायत विभागाचे विस्तार अधिकारी लाच घेतांना जाळ्यात

कमलेश जाब्रस

माजलगाव (जि. बीड) - सेवाजेष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो जिल्हा परिषद बीडला पाठवून केलेल्या कामाच्या मोबदल्यात पाच हजार रूपयांची लाच घेतांना येथील पंचायत समितीमधील ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी रामचंद्र होनाजी रोडेवाड यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. 6) पकडले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, केसापुरी ग्रामपंचायत कार्यालयातील लिपीक त्यांचे दहा वर्षे पूर्ण झाल्याने सेवाजेष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो जिल्हा परिषद बीड येथे पाठवून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून दहा हजार रूपये लाचेची मागणी केली. तडजोड करून पाच हजार रूपये स्विकारतांना ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी रामचंद्र होनाजी रोडेवाड यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक विशाल खांबे, पोलिस उपाधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल धस, पोलिस अमलदार भरत गारदे, श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, अविनाश गवळी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT