Shaikh Hayaz 
मराठवाडा

Accident : रोहित्र अंगावर पडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू; महावितरणने हात झटकले

संतोष शेळके

करमाड : पाणीपुरवठा विहीरीचा विद्दुत पुरवठा बंद असल्याने रोहित्रावरील (डीपी) फ्यूज टाकत असताना डीपी अंगावर पडून ग्रामपंचायतचा 49 वर्षीय पाणीपुरवठा कर्मचारी त्याखाली दबून जागीच गतप्राण झाला. ही घटना मंगळवारी (ता. सहा) सकाळी सात वाजेच्या सुमारास गाढेजळगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे उघडकीस आली.

शेख हयाज शेख नसरुद्दीन (49, रा. गाढेजळगाव) असे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गावच्या पाणीपुरवठा योजनेस विद्युत पुरवठा करणारे रोहित्र गावालगत आहे. दरम्यान, ही डीपी काही दिवसांपूर्वी वारंटी काळात नादुरुस्त झाले. त्यामुळे वीज वितरण कंपनी मार्फत तात्पुरत्या स्वरूपात दुसरी डीपी बसविण्यात आली होती.

मंगळवारी सकाळी पाणी सोडण्यासाठी फ्यूज नसल्याने शेख हयाज हे डीपीवर गेले होते. याचवेळी फ्यूज टाकत असताना थेट डीपीच त्यांच्या अंगावर कोसळली व याखाली दबून त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, घटनास्थळ हे गावालगत व मुख्य रस्त्यावर असल्याने अनेकजनांच्या नजरेस ही घटना पडली. तात्काळ, डीपी बाजूला करून शेख हयाज यांना वरुडी येथील नूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, दरम्यान डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

ग्रामस्थांचा वीज वितरणवर आरोप

सदरील डीपी तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आल्याने वीज वितरण कंपनीने पूर्ण नटबोल्ट न बसवता वायररोप लावून जागेवर लावली होती, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. यातच मागील दोन-चार दिवसांपासून चक्री वादळ होत असल्याने पूर्ण ताकदीने न बसवलेल्या डीपी ने जागा सोडली असावी व ही घटना घडली.

दरम्यान, वीज वितरण कंपनीने हे आरोप फेटाळत आज डीपीवर काही काम करावयाचे होते. तसेच तशी कुठलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे सांगत मूळ प्रश्नला बगल देण्याचा प्रयत्न होत आहे. करमाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. नूर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनाची तर करमाड पोलीस ठाण्यातही घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT