नातवाने केला आजोबावर भरदिवसा कोयत्याने हल्ला; आजोबाचा जागीच मृत्यू  Sakal
मराठवाडा

Beed Crime News : नातवाने केला आजोबावर भरदिवसा कोयत्याने हल्ला; आजोबाचा जागीच मृत्यू

घटनेनंतर हल्लेखोर तरूण हा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

रामदास साबळे

केज : पंचेवीस वर्षीय तरूणाने देवदर्शन करून मंदिरातून बाहेर पडत असलेल्या वृद्ध आजोबांवर धारदार कोयत्याने हल्ला केल्याची घटना मंगळवार (ता.०५) रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास केज शहरातील कानडी रस्त्यालगत असलेल्या सिद्धी विनायक गणेश मंदिराजवळ घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या आजोबाचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनेनंतर हल्लेखोर तरूण हा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या आजोबाचे नाव गिरधारी किसनलाल शिल्लक (वय-६०) असे आहे. नेहमी गर्दीने गजबजलेल्या भागात घडल्याने केज शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील कानडी रस्ता परिसरातील गिरधारी शिल्लक हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे मंगळवार सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जवळच असलेल्या सिद्धी विनायक गणेश मंदिरात मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते.

ते देवदर्शन करून मंदिराच्या बाहेर येत होते. याच सुमारास मंदिराच्या बाजूला दबा धरून बसलेला त्यांच्या पुतण्याचा मुलगा नात्याने त्यांचा चुलत नातू रोहित रतन शिल्लक (वय-२५) याने आजोबांना मंदिराच्या जवळ असलेल्या आडबाजूला ओढत नेऊन धारदार शस्त्राने डोक्यात व मानेवर सलग तेरा सपासप वार केले.

या हल्ल्यात गिरधारी शिल्लक यांची डोक्याची कवटी फुटून मानेच्या शिरा तुटल्याने त्याच त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर रोहीत शिल्लक हा स्वतः केज पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला. या खूनाच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांनी सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT