file photo 
मराठवाडा

कामाच्या ठिकाणी महिला संरक्षणासाठी तक्रार समिती

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयांतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधकारक आहे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. पी. काळम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

या अधिनियमान्वये जिल्हा, तालुकास्तर व इतर ठिकाणी ज्या आस्थापनेत दहा किंवा त्यापेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत अशा प्रत्येक शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये, शासन अनुदानित संस्था, महामंडळे, सहकारी संस्था आदी अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे बंधनकारक आहे. यापुर्वी अशा समित्या काही कार्यालयाने स्थापन केल्या आहेत. परंतू या समितीत काही व्यक्ती बदलल्या असतील त्यामुळे सदर समिती पुरर्गठीत करणे, अद्यावत, नव्याने गठीत करणे आावश्यक आहे. ज्या आस्थापनेवर दहा किंवा त्यापेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत अशा कार्यालय प्रमुखांनी अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करुन त्याची प्रत व दर तिमाही, सहामाही, वार्षिक अहवाल (अत्याचाराची घटना घडो अथवा न घडो) जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी कार्यालय शास्त्रीनगर नांदेड यांना उपलब्ध करुन दयावी, असेही आवाहन जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

खुरगांव येथे माता रमाई जयंती

नांदेड : माघ पौर्णिमा व माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात खुरगांव- नांदूसा (ता. नांदेड) येथील श्रामनेर प्रशिक्षण व संस्कार केंद्रात साजरी करण्यात आली.भदंत पय्यांबोधी यांच्या पुढाकारात भारतातील पहिले एतिहासिक श्रामनेर प्रशिक्षण व संस्कार केंद्र दीड एकर परिसरात उभारले जाणार आहे.

यावेळी उपस्थीत उपासक व उपासकांनी वस्तुरुपी आर्थिक सहकार्य केले. यात अंजनाबाई नागेश यांनी ५० हजाराचा बोर पाडून दिला आहे. पुण्याच्या एका दानशुर उपासकाने पंचवीस हजार रुपयांची वीट सदरील केंद्राच्या उभारणीसाठी दान दिले. पंचायत समितीच्या सभापती कांताबाई सावंत यांनी सुद्धा पाच हजार रुपयांचे दान दिले.
 
भन्तेगणंची उपस्थिती

याप्रसंगी भदंत पंयाबोधी म्हणाले की, याच ठिकाणी प्रत्येक पौर्णिमा व महापुरूषाच्या जयंत्याही साजऱ्या केल्या जातात. या कार्यक्रमास उपस्थितीत भदंत महामोगगालान, भदंत संघरतन, भदंत नागसेन, भदंत धम्मशिलो, भदंत दीपंकर, भदंत मेतानंद, भदंत शांतीरतन, भदंत सुदर्शन यांच्यासह आदींनी धम्मदेशना दिली. तसेच सुखदेव चिखलीकर, रमेश सोनाळे, प्रा. साहेबराव इंगोले, प्रा. एस. एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे आणि सम्राट मित्रमंडळ व उपासक- उपासकांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य! आंदोलन करून गणेशोत्सवावर ताण आणू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

FDA Crime : सणासुदीच्या काळात ‘एफडीए’ची कारवाई; ५६ लाखांचा अन्नसाठा जप्त, पुणे विभागातील १२ आस्थापनांवर छापे

SCROLL FOR NEXT