Wedding News esakal
मराठवाडा

चक्क बैलगाडीतून आलं वऱ्हाड, मग काय लग्न सोहळ्याची चर्चा होणारचं !

चक्क बैलगाडीतून आलं वऱ्हाड

सुभाष बिडे

घनसावंगी (जि.जालना) : घनसावंगी (Ghansawangi) तालुक्यातील अव्वलगाव बुद्रुक येथे नुकताच एक विवाह सोहळा पार पडला. या आधुनिक युगात वऱ्हाड चक्क बैलगाडीतून आल्याने तालुक्यात हा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे. अव्वलगाव बुद्रुक येथे नुकताच १५ एप्रिल रोजी अंकुशराव पवार यांचे चिरंजीव नागनाथ पवार व कचरू निचळ यांची कन्या वर्षा निचळ यांचा विवाह सोहळा पार पडला. विवाह (Wedding) सोहळा म्हटले की प्रसिध्दी मिळवण्यासाठी कुणी आलिशान गाड्या तर कुणी हेलिकॉप्टरचा उपयोग करतात. (Groom And His Relatives Arrived Wedding Venue By Bullock Cart In Ghansawangi Of Jalna District)

लग्न समारंभासाठी वाहनाचा खर्च करणे व यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अव्वलगाव बुद्रुक येथील अंकुशराव पवार यांनी आपल्या मुलाचा विवाह साध्या पद्धतीने करून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वधूचे घर गावात तर वराचे घर शेतात आहे.

त्यामुळे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या विवाह सोहळ्यासाठी नवरदेवाचे वडील अंकुशराव पवार यांनी चक्क बैलगाडीतून वऱ्हाड आणल्याने तालुक्यात हा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे. बैलगाडीतून वऱ्हाड आल्याने अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Insurance Bill: विमा क्षेत्रात मोठी झेप! ‘सबका बिमा सबकी रक्षा’ विधेयक मंजूर; नव्या कायद्याचे परिणाम काय?

Tourist Bus Accident : पर्यटकांची मिनी बस चढावरून अचानक जाऊ लागली मागे; तरूणींनी जीव वाचवण्यासाठी मारल्या उड्या!

Manikrao Kokate Resign: राजकीय उलथापालथ! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; क्रीडा खात्याची जबाबदारी कुणाकडे?

IND vs SA, T20I: भारत-दक्षिण आफ्रिका संघातील लखनौत होणारा चौथा सामना रद्द; कारण घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं

SCROLL FOR NEXT