शंकरराव गडाख, पालकमंत्री Shankarrao Gadakh
मराठवाडा

पालकमंत्री शंकरराव गडाख आले, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

वैभव पाटील

नायगाव (जि.उस्मानाबाद) : पालकमंत्री आपल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करतील, या आशेने त्यांची वाट बघत थांबलेल्या शेतकऱ्यांचा अखेर हिरमोड झाला. कारण पालकमंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) आले आणि दौरा आटोपता घेत निघुन गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग झाला. बुधवारी (ता.२९) उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी कळंब (Kalamb) तालुक्याचा दौरा केला. या तालुक्यात पुरामुळे नुकसान झालेल्या वाकडी, सौंदाण या गावांची त्यांनी पाहणी केली. आता हे पालकमंत्री आपल्याकडेही येतील म्हणून नायगाव (Naigaon) महसूल मंडळातील नायगावसह पाडोळी, बोरगाव, रायगाव्हण या गावातील शेतकरी त्यांची वाट पाहात बसले होते. या गावात अतिवृष्टीमुळे नायगाव, पाडोळी मार्गावर अर्धा पूल वाहून गेला. पिकांचेही नुकसान झाले. या (Osmanabad) नुकसानीची माहिती, देऊन व्यथा मांडता येईल असे या शेतकऱ्यांना वाटले होते. परंतू पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री गडाख आले आणि आपला दौरा आटोपता घेत निघुन गेले. त्यामुळे त्यांची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग व हिरमोड झाला.

पदरातले हिरावले

या भागातील शेतकऱ्यांचे पदरात आलेले पिक हिरावण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. मागील वर्षीही परतीच्या पावसाने पदरात आलेले पीके हिरावले होते. नुकसान होऊनही गेल्या दोन वर्षांपासून येथील शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही. यातच सोमवारी व मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकासह उडीद, मूग, ऊसासह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत होऊन शेतकरी उद्ध्वस्त झाले आहे. सरकारने याची दखल घेऊन तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT