guthka sakal
मराठवाडा

हिंगोली येथील एनटीसीमध्ये पोलिसांच्या छाप्यात तीन लाख ५० हजाराचा गुटखा जप्त

आनंद अग्रवाल व चालक सागर लोखंडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल

राजेश दरव्हेकर

हिंगोली : शहरातील एनटीसी भागात पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी ता. ३१टाकलेल्या छाप्यात तीन लाख पन्नास हजाराचा गुटखा व एक वाहन असा पाच लाखांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एनटीसी भागात एका घरामध्ये वाहनातून आणलेला गुटखा उतरविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख जमादार भगवान मंडलीक, संतोष बंडे यांच्या पथकाने सकाळी येथे छापा टाकला असता यात एका वाहनातून रजनीगंधा व इतर गुटख्याचज पोते आनंद अग्रवाल याच्या घरात उतरविली जात असल्याचे निदर्शनास आले.(Gutka worth Rs 350000 seized in police raid at NTC in Hingoli)

पोलिसांनी चालक सागर लोखंडे रा . गंगानगर याच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली . त्यांनतर पोलिसांनी पोती उघडून बघितली असता त्यात गुटखा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सागर यास ताब्यात घेतले असून त्याच्या कडून तीन लाख पन्नास हजार रुपये किंमतीची गुटख्याची पोती व एक वाहन असा पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी आनंद अग्रवाल व चालक सागर लोखंडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT