varhadi 
मराठवाडा

गेले होते वऱ्हाडी म्हणून; पण काढावा लागला पळ

राजेश दारव्हेकर

हिंगोली ः तालुक्यातील बोरजा येथे गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दोन बहिणींचे एकाच मंडपात लग्न लागले. दोन्ही ताईंच्या लग्नाला जायच हाय, म्हणत तब्बल पाचशेपेक्षा अधिक वऱ्हाडी तेथे पोहचली. लग्नासाठी केवळ ५० लोकांची परवानगी असताना एवढ्या मोठ्या लग्नाची कुणकुण प्रशासनाला लागली. काही वेळातच बासंबा पोलिसांसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार लग्नघरी दाखल झाले. यानंतर मग वऱ्हाडी मंडळींची पळापळ सुरू झाली. फिजिकल डिस्टंन्सिंग, मास्क न वापरणाऱ्यावर व लग्न सोहळा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रकीया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

हिंगोली तालुक्यातील बोरजा येथे दोन सख्ख्या बहिणींचे लग्न गुरूवारी मोठ्या गाजावाज्यात पार पडले. या दोन्ही बहिणींच्या लग्नाला दोन्ही नवरदेवांची वऱ्हाडी मंडळीही पोहचल्याने, लग्नात सहभागी होणाऱ्यांची संख्या जास्तीत जास्त शंभरच्या घरात असणे अपेक्षित असताना त्याठिकाणी सुमारे पाचशेपेक्षा जास्त वऱ्हाडी जमली आणि यात फिजिकल डिस्टंसिंग, मास्क वापरण्याच्या सक्तीची ऐशीतैशी होत असल्याची माहिती बासंबा पोलिसांना मिळाली. 

वऱ्हाडी मंडळींचे मिळेल त्या दिशेने पलायन
बासंबा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप मालपिल्लू यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर हिंगोलीचे उपविभागीय दंडाधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे यांच्यासह महसूल विभागाचे पथकही दाखल झाले. पोलिसांची जीप पाहताच अनेक वऱ्हाडी मंडळींनी रस्ता मिळेल त्या दिशेने पलायन केले आणि स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला.

माहिती घेण्याचे काम सुरू
या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही आणि कार्यक्रमास जबाबदार असणारे आणि मास्क न वापरणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे उपविभागीय अधिकरी अतुल चोरमारे यांनी सांगितले. बासंबाचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप मालपिल्लू यांनी सांगितले, महसूलचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्याकडून अद्याप फिर्याद देण्यात आली नाही किंवा चौकशी अहवाल प्राप्त झाला नाही. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही. प्रकरणात घेण्यात आलेले पोलिस पाटील आणि सरपंच यांचे जबाब या लग्न समारंभात मर्यादेपेक्षा जास्त लोक असल्याच्या बाबीला पुष्टी देणारे नसल्याचे समजते. त्यामुळेही गुन्हा दाखल होण्यास उशिर होत आहे. 

(संपादन ः राजन मंगरुळकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: मराठी अभिनेत्रीसोबत एका रात्रीसाठी २ लाख; मुंबईत हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; समोर आली धक्कादायक माहिती

Property Tax : कर सवलतीची आजच संधी; मिळकतकर थकबाकीदारांवर उद्यापासून जप्तीची कारवाई

Latest Marathi News Live Update : जिल्हाधिकाऱ्यांच्या कथित बनावट सहीप्रकरणी मोठी कारवाई; चामोर्शी नगरसेवकाला ५ दिवसांची पोलीस कोठडी

Vat Purnima Heart Attack Death : पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजला वटवृक्ष; वाण देतानाच आला हृदयविकाराचा तीव्र झटका, सिंधुदुर्गातील 'या' सावित्रीचा दुर्दैवी अंत

Kas Plateau Flower Season : पर्यटकांसाठी मोठी अपडेट! कास पठारावर फुलांचा हंगाम कधीपासून सुरू होणार? यंदा काय असणार खास? वनविभागाची पूर्वतयारी सुरू

SCROLL FOR NEXT