ST bus Sakal
मराठवाडा

परभणी : जिल्ह्यातील निम्म्या बसगाड्या नादुरुस्त

परभणी जिल्ह्यातील चित्र, अनेक फेऱ्यांवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा

परभणी - पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा विपरित परिणाम बसगाड्यांवर दिसून आला. जिल्ह्यातील चार आगारांतील जवळपास निम्म्या बसगाड्या नादुरुस्त झाल्या असल्याचे पाहणीत समोर आले आहे. त्यामुळे या बस दुरुस्तीसाठी महामंडळाला बराच कालावधी लागणार आहे. त्याचा परिणाम अनेक फेऱ्यांवर होणार आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर गेले होते. प्रदीर्घ चाललेला हा संपामुळे राज्यशासनासमोर मोठा पेच उभा केला होता. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार ता. २२ एप्रिलला जवळपास सर्वच कर्मचारी कामावर हजर झाले. त्यामुळे महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून सुपरिचित असलेल्या एसटीची चाके परत एकदा जोरात फिरू लागली आहेत. कर्मचारी कामावर हजर झाल्याने सर्वसामान्यांच्या वाहतुकीचा प्रश्न सुटला आहे. महामंडळासमोर आता प्रदीर्घ काळासाठी एकाच ठिकाणी थांबून असलेल्या बस गाड्यांच्या नादुरुस्तीचे दुसरे मोठे संकट उभे आहे.

सध्या जिल्ह्यातील चार आगारांत २६३ बसगाड्या आहेत. त्यापैकी ता. २४ एप्रिलपर्यंत १५८ बसगाड्या मार्गावर धावत होत्या. उर्वरित बसगाड्या या नादुरुस्तीमुळे कार्यशाळेत उभ्या होत्या. त्यांना दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. त्यात बऱ्याच एसटी बस गाड्याच्या बॅटऱ्या पूर्णपणे खराब झाल्याचेही पाहणीत समोर आले आहे. इतर गाड्यामध्ये किरकोळ दुरुस्त्या कराव्या लागत आहेत.

ग्रामीण भागाची अडचण दूर

आठ दिवसांपूर्वी कमी कर्मचाऱ्यामुळे फक्त तालुका व जिल्हास्तरावरून बस सुरू होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची मोठी अडचण होत होती. परंतु, आता सर्वच आगारातून ग्रामीण फेऱ्या सुरू झाल्याने ग्रामीण भागातील रहिवाशांची सोय झाली आहे.

उत्पन्नात झाली वाढ

सर्व भागातील फेऱ्या पूर्णपणे सुरू झाल्याने रोजच्या उत्पन्नात वाढ दिसून आली आहे. परभणी जिल्ह्याचे सरासरी उत्पन्न २० लाखांच्या आसपास होते. आता रोज १८ ते १९ लाखाचे उत्पन्न प्रवासी वाहतुकीमधून होत आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर मंत्र्यांचा यु-टर्न! संघटनांच्या संतापानंतर सरकारची माघार; थेट अटकेच्या मुद्द्यावर भूमिका बदलली

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

IPL 2026 मध्ये २-३ हजार धावा करायच्या आहेत! वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वास पाहून सारेच चक्रावले; म्हणाला, वैयक्तिक विक्रम...

Iran Israel War Anxiety : युद्धाची चाहूल आणि मनातली घालमेल; असुरक्षिततेच्या काळात भावनिक स्थैर्य कसे राखाल?

Gambhir on Dhoni: 'माझी इच्छा आहे की एक दिवस त्याने माझ्या जागेवर यावं आणि मी त्याला...' धोनीबद्दल काय म्हणाला गंभीर?

SCROLL FOR NEXT