crime crime
मराठवाडा

सूर्यमंदिर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांना अटक

गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती

सकाळ वृत्तसेवा

गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती

गेवराई (बीड): बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये चकलांबा पोलिस ठाण्यात कोळगाव येथील सूर्यमंदिर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांच्यावर गुन्हा दाखल होता. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील फेटाळला होता. बीडच्या सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या महाराजांनी आत्महत्येचा इशारा देत काही काळ पोलिस प्रशासनाची दिशाभूल केली होती. परंतु गुरुवारी (ता.२६) सकाळी गेवराई पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाने त्यांना अटक केली.

तालुक्यातील कोळगाव येथील सूर्य मंदिर संस्थानचे हनुमान महाराज गिरी यांच्या विरोधात चकलांबा पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. माझ्या मृत्यूला गावातील काही राजकीय व्यक्ती, पत्रकार, पीडित कुटुंब जबाबदार आहे. अवघ्या पाच मिनिटांत मी गळफास लावणार असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल करून ते पसार झाले होते. सलग तीन दिवस पोलिस त्यांचा शोध घेत होते. परंतु त्यांचा तपास लागत नव्हता. यावेळी महारांजाच्या नातेवाईकांकडून हनुमान महाराज जिवंत असल्याची पुष्टी पोलिसांना झाल्यानंतर त्यांनी शोध मोहीम थांबवली.

मात्र महाराज पोलिसांना सापडले नव्हते. हनुमान महाराज गिरी यांनी मागील काही दिवसांपूर्वी बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश (२) यांच्यासमोर सुनावणी झाली, मात्र न्यायालयाने हनुमान महाराज गिरी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे महाराजांच्या अडचणींत वाढ झाली होती. दरम्यान त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. मात्र खंडपीठाने तो फेटाळला होता. अखेर गुरुवारी गेवराईचे उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांच्या सूचनेवरून चंकलाबा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. महाराजांना गेवराई सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT