File photo 
मराठवाडा

मनातील विचारांच्या गर्दीने होतोय आनंद दूर 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जेव्हा माणूस बेकायदेशीर, माणूसकीची सोडून, मनाच्या विरोधात अन् चुकीचे वागतो तेव्हा नकारात्मक विचारांची गर्दी होते. राग,द्वेष, मत्सर, भीती, अपमान, सुडाची भावना, पराभव झाला याची खंत, पुढे पराभव तर होणार नाही ना याची भीती? पराभव झाला तर जगण्याला अर्थ राहणार नाही असे वाटू लागल्यावर पुढे मानसिक वेदना सहन कराव्या लागतात. याच मानसिक वेदना पुढे विचाराला भव-यासारखं गरगर फिरवतात.


मानसिक आंदोलने, काही समजत नाही, काय करावे?असं झालं तर कसं होईल तसं झालं तर कसं होईल? असं करायला नको होतं तसं करायला नको होते, असं असं करायला हवे होते, तसं करायला हवं होते, यांच्यामुळे असे झाले, त्यांच्यामुळे तसे झाले, केले तर बरं राहिलं का तसं केलं तर बरं राहिलं, कसंही करून बघितले तरी काहीतरी राहूनच चालयं, असे  वाटतं असेल तेव्हा मानसिक त्रास होतो. मन, डोकं फिरायला लागते. अस्थिरता वाट्याला येते, मग समाधान दूर राहते. कोणतंही काम धड होतं नाही, मनासारखं काही घडतं नाही.याचं तोंड पाहावे वाटतं नाही; पण पाहावं लागते काय करावं!अशा अगतिक मन:स्थितीत सापडलेली माणसं उदास,निराश होतात.आत्मविश्वास गमावून बसतात.
आता काही करून काहीच फायदा दिसत नाही, जगणं  ओझं वाटते,कशातच रस वाटत नाही, असे वाटणं वाढत गेले की,अन्न गोड लागत नाही, झोप धड लागतं नाही,  ह्रदय धडधडत राहते. सतत वेदना बाहेर येत राहतात.

ध्येयाच्या दिशेने टाकलेले
प्रत्येक पाऊल आनंद देते  

ध्येय हे यशाचा, आनंदाचा, सुखासमाधानाचा भाग मानला पाहिजे. वेळेचे नियोजन करून आवश्यक बाबी मन लावून करत वाटचाल केल्यास फायदा होतो. सगळ्याच क्षेत्रात लुडबूड करायची नाही. ज्या क्षेत्रात काम करायला वेळ नाही, त्यामुळे विनाकारण डोक्याचा भुगा, उकिरडा करण्याला काही अर्थ राहत नाही, याची जाणीव करून देऊन सर्वत्र भटकंती करणा-या मनाला आवरलं, सावरलं पाहिजे. शांती समाधान, क्षमा, दया, करूणा आणि प्रेम या भावनेला प्राधान्य दिले पाहिजे. योग्य मार्गदर्शन करणारे गुरु, समविचारी, समजून घेणारे एक दोन मित्रांचे मार्गदर्शन, योगसाधना, रूचेल ते अन् पचेल ते खाणं उपकारक ठरते. वर्तमानात समरसून जगण्याचा अभ्यास, सेवा, सत्संग, निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ देणं, सकारात्मक ग्रंथांचे वाचन, आनंददायी छंदाची जोपासना करत सतत मनाला सकारात्मक संदेश देत ध्येयासाठी आवश्यक कृती आणि उक्ती करत गेलो तर नक्कीच फायदेशीर ठरते.


मनासारखं सर्वकाही घडत नाही
सगळ्यांनाच कमी अधिक प्रमाणात प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागते. नको ते वाट्याला येते. विधायक ध्येय डोळ्यांसमोर ठेवून यथाशक्ती, यथामती, कौशल्य, शहाणपण याचा वापर करत, जितके मिळाले तितके सहकार्य घेऊन वाटचाल केल्यास नक्कीच फायदा होईल, असे वारंवार  सांगितले पाहिजे. 
- डॉ. हनुमंत भोपाळे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Video: वैभव सूर्यवंशीची दोन सिक्ससह दणक्यात सुरुवात, पण मग कशी पडली विकेट? माघारी जाताना झाला भावूक

तुम्हीच सांगा उपवास कसा करायचा? सणासुदीच्या काळात भगरीच्या किंमतीत दुप्पटीने वाढ, साबुदाणाही महागला, पण किती?

Nagpur RTO Crackdown: नागपूरमध्ये HSRP नसलेल्या वाहनांवर RTOची धडक कारवाई; तीन दिवसांत १७२ वाहनांवर ई-चलान, १.७२ लाखांचा दंड

Melghat Teachers Scam: मेळघाटातील कंत्राटी शिक्षक भरतीत मोठा घोळ? आरटीई व संचमान्यतेला हरताळ, प्रहार संघटनेचा पारदर्शक प्रक्रियेचा आग्रह

Nagpur Education : मनपाच्या नव्या इंग्रजी शाळा अजूनही कागदावरच; आठवडा उलटला तरी प्रवेशप्रक्रिया ठप्प, पालक संभ्रमात

SCROLL FOR NEXT