मराठवाडा

नांदेड संशोधन केंद्राकडून शेतकऱ्यांना खुष खबर....काय ते वाचा

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत नांदेड कापूस संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर संशोधीत झालेल्या एनएचएच २५० व एनएचएच ७१५ हे दोन संकरित वाण आता बिटी (बीजी-दोन) स्वरुपात उपलब्ध होणार आहेत. या बाबत कृषी विद्यापीठ परभणी व अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्यात बुधवारी (ता. ११) अकोला येथे सामंजस्य करार झाला. यावर विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर व महाबीजचे महाव्यवस्थापक (गुणनियंत्रण) डॉ. प्रफुल्ल लहाने यांनी स्वाक्षरी केली.

वरिष्ठ पातळीवर अधिकारी उपस्थित 
परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवन, महाबीजचे व्यवस्थापकीये संचालक अनिल भंडारी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. श्री. खर्चे, नांदेड येथील कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग, महाबीजचे महाव्यवस्थापक (उत्पादन) पांडुरंग फुंडकर, श्री खिस्ते व नांदेड कापूस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. दिनेश पाटील, डॉ. शिवाजी तेलंग, प्रा. अरुण गायकवाड आदी उपस्थित होते.

नांदेड -४४ वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस
मागील हंगामामध्ये वसंतराव नाइक कृषी विद्यापीठ व महाबीज यांच्या सामंजस्य करारातून तयार झालेला ‘एनएचएच - ४४’ हा बीटी वाण शेतकऱ्यांना महाबीजकडून मराठवाड्यामध्ये वितरीत करण्यात आला. या वाणास शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. या वाणाचे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले आहे.
त्याचप्रमाणे राज्याच्या अन्य भागातून एनएचएच ४४ बीटी या वाणाची उपलब्धता करण्यासाठी महाबीजकडे मागणी वाढत आहे. त्यामुळे विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन बीटी वाणांची मागणी तयार झाली. 

दोन संकरीत वाण आता बिटी स्वरुपात
परभणी कृषी विद्यापीठाच्या नांदेड कापूस संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर संशोधीत झालेल्या एनएचएच २५० व एनएचएच ७१५ हे दोन संकरित नवीन वाणांचे जनुकीय तंत्रज्ञान युक्त (बोलगार्ड - दोन) स्वरुपात संस्करण महाबीजद्वारे करण्यात येणार आहे. हे दोन्ही वाण रसशोषण करणाऱ्या किडींना सहनशील आहेत. 

मध्य व दक्षीण भारतातुन मागणी
एनएचएच २५० हा वाण मध्य भारतातील महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश व ओरिसा या राज्यांमध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. एनएचएच ७१५ हा वाण मध्य भारत व दक्षिण भारतातील (कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना व तमिळनाडू) राज्यांमध्ये लागवडीसाठी २०१८ मध्ये प्रसारीत करण्यात आला आहे. हे दोन्ही वाण उत्पादन व धाग्याची गुणधर्म या दोन्ही बाबतीत राष्ट्रीय स्तरावरील संशोधनात सरस आढळून आले आहेत. या वाणांचे बोलगार्ड २ स्वरूपातील बियाणे २०२२ हंगामातील शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकेल असे यावेळी सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणाले तर तुम्हीही घोडाच म्हणा; सरकारी कामाबाबत गडकरींचं विधान

Samsung Galaxy S24 Ultra मोबाईलवर चक्क 70 हजारचा डिस्काउंट; प्रीमियम ऑफर पाहा एका क्लिकवर

Political Astrology : अजित पवारांच्या मागची साडेसाती कधी संपणार? या महिन्यात होणार मोठा राजकीय बदल, जाणून घ्या भविष्य....

Asia Cup, IND vs PAK: मोदींना शेवटची संधी होती..उद्धव ठाकरे खवळले, महिला शिवसैनिक पंतप्रधानांना सिंदूर पाठवणार!

Latest Marathi News Updates : विंचूर उपबाजार आवारात कांद्याला कमी भाव, संतप्त शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन

SCROLL FOR NEXT