मराठवाडा

लॉकडाउन वाढीसंदर्भात 15 तारखेला निर्णय : आरोग्यमंत्री टोपे

सध्या राज्यात प्रत्येक दिवसाला ५० ते ५५ हजारपर्यंत कोरोना रूग्ण संख्या येत आहे

उमेश वाघमारे

यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यातील कोरोना रूग्ण दर काही प्रमाणात कमी झाला आहे. विशेष करून राज्यातील ३६ जिल्ह्यापैकी बारा जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे.

जालना : सध्या राज्यात प्रत्येक दिवसाला ५० ते ५५ हजारपर्यंत कोरोना (Corona) रूग्ण संख्या येत आहे. त्यामुळे राज्याच्या लॉकडाउनमध्ये (Lockdown) वाढ करायची की नाही यासंदर्भात (ता. १५) मे दरम्यान निर्णय घेण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी शनिवारी (ता.आठ) जालना येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. (Health Minister Rajesh Tope said that a decision will be taken on the 15th may regarding the increase in lockdown in Jalna)

यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यातील कोरोना रूग्ण दर काही प्रमाणात कमी झाला आहे. विशेष करून राज्यातील ३६ जिल्ह्यापैकी बारा जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. परंतु, इतर जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढीचा दर कायम आहे. तर काही जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्ण वाढ होत आहे, त्या जिल्ह्यांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून असून अशा जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्ण संख्या वाढत राहिली तर कडक लॉकडाउन लावावा लागेल. तसेच राज्याच्या एक तृतीयांश भागामध्ये कोरोना रूग्ण संख्याचा दर स्थिर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्ये वाढ करायची की नाही ? याचा निर्णय (ता. १५) मे दरम्यान घेण्यात येईल, असे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी म्हटले आहे.

(Health Minister Rajesh Tope said that a decision will be taken on the 15th may regarding the increase in lockdown in Jalna)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: भोरमध्ये दुसऱ्या फेरीत भाजपला आघाडी, फुरसुंगीत अजित पवार गट पुढे

Solapur : स्ट्राँग रूमची चावी हरवली, शेवटी अधिकाऱ्यांनी कुलूप तोडलं; मतमोजणीला उशिरा सुरुवात

Latest Marathi News Live Update: उपचार सोडून उमेदवार थेट रुग्णवाहिकेतून मुलाखत द्यायला अजित पवारांकडे दाखल

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

Kolhapur Election Result : कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणीला सुरूवात, कागलमध्ये निकालापूर्वी अभिनंदनाचे बॅनर लावल्याने तणाव; उत्कंठा शिगेला

SCROLL FOR NEXT