Maharashtra University Of Health Sciences, Latur News 
मराठवाडा

लातूरात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकेंद्र, कुलगुरूंची माहिती

सुशांत सांगवे

लातूर  : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकेंद्र, लातूर येथे सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव आमच्याकडे आला आहे. त्याला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर यांनी ‘सकाळ’ला दिली. या निर्णयामुळे लातूरबरोबरच नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर या चार शहरांतील हजारो विद्यार्थ्यांची ‘नाशिक-वारी’ वाचणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २२ वा वर्धापनदिन सोहळा नुकताच झाला.

या सोहळ्यातही डॉ.म्हैसेकर यांनी लातूरात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभागीय केंद्र होईल, याबाबतचे सूतोवाच केले होते. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत हा विषय ठेवला जाणार आहे. त्यानंतर याची अंतिम घोषणा होईल, अशी माहिती दिली. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर आणि विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य डॉ. डी. एन. चिंते यांनी याबाबचा प्रस्ताव विद्यापीठाकडे दिला असल्याचेही ते म्हणाले.


डॉ. चिंते म्हणाले, लातूरात या विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करावे म्हणून गेल्या १५ वर्षांपासून आमचा पाठपुरावा सुरू आहे. या खात्याचे मंत्री अमित देशमुख यांच्याकडेही आम्ही मागणी केली. या केंद्रांतर्गत प्रिव्हेंशन ॲन्ड मॅनेजमेंट ऑफ कम्यूनिकेबल डिसिज या विषयाअंतर्गत संशोधन केंद्र उभारून रोजगार निर्मिती करावी, असे आम्ही प्रस्तावात नमूद केले आहे. डॉ.ठाकूर म्हणाले, लातूरात हे उपकेंद्र होणे गरजेचे आहे. याचा विचार करून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या आवारातील जागा या उपकेंद्रासाठी दिली जाणार आहे.


लातूरात दोन उपकेंद्रे
दिवंगत माजी मुख्यंमत्री विलासराव देशमुख यांनी लातूरपासून जवळच असलेल्या पेठ येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र आणण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ते मुख्यमंत्री होते. लातूरात २००७-०८मध्ये विद्यापीठाच्या या उपकेंद्राला सुरवात झाली. त्यानंतर आता त्यांचे पुत्र आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभागीय उपकेंद्र लातूरात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे लातूरात लवकरच दोन विद्यापीठांचे उपकेंद्रे पाहायला मिळणार आहेत.


आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर ही पाच उपकेंद्रे सध्या कार्यरत आहेत. पण, कोल्हापूर हे केंद्र सोलापूरसह इतर शहरातील विद्यार्थी-प्राध्यापकांना दूर पडत होते. संलग्नीत महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या कार्यालयीन कामातील अडचणी लवकर सुटाव्यात म्हणून लातूर येथे उपकेंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली जाणार आहे.
- डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरू
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

Pune Traffic: अंगारकी संकष्टीत दगडूशेठ गणपती दर्शनासाठी गर्दी; पुणे मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT