weather update jalna increases heat wave Avoid heatstroke do this health sakal
मराठवाडा

Heat wave : मराठवाड्यात उष्माघाताचे दोन बळी! मृत्यूंची संख्या तीनवर

सकाळ वृत्तसेवा

हिमायतनगर/पाचोड : आडूळ बुद्रुक (ता. पैठण) आणि हिमायतनगर येथे उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाला. यापूर्वी कनेरगावनाका (ता. हिंगोली) येथील एका चार वर्षीय चिमुकलीचा महिनाभरापूर्वी मृत्यू झाला होता. आता मराठवाड्यात उष्माघाताच्या बळीची संख्या एकूण तीनवर गेली आहे.

हिमायतनगर (जिल्हा नांदेड) येथील विशाल रामराव मादसवार (वय २८) यांनी शुक्रवारी (ता. १२) दिवसभर शेतात काम केले. घरी आल्यावर रात्री जेवणानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

दुसऱ्या घटनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडूळ बुद्रुक (ता. पैठण) येथे शनिवारी (ता. १३) तातेराव ऊर्फ बंडू मदन वाघ (वय ३८) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. तातेराव हेसुद्धा शेतात कामासाठी गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास शेतातून घरी येत असताना गावातील इस्लामपुरा भागातील अश्पाक किराणा दुकानासमोर भोवळ येऊन पडले. परिसरातील नागरिकांना त्यांना आडूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पण, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

सध्या तीव्र उन्ह आहे. उन्हात फिरणे टाळा. बाहेर जाण्याची गरज पडली तर डोक्याला पांढरा सुती रुमाल गुंडाळावा. सोबत पाणी बॉटल ठेवून सतत पाणी प्यावे. अशक्तपणा, उलटी, जुलाब हा त्रास जाणवताच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- डॉ. शिवाजी भोजने, वैद्यकीय अधिकारी, आडूळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT