निलंगा (जि.लातूर) : निलंगा शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस झाला.  
मराठवाडा

निलंगा तालुक्याला पावसाने झोडपले,शेतकरी गेला पाण्यात वाहून

राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : निलंगा शहरासह तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाला प्रारंभ झाला असून सोमवारी (ता.३०) शहर व परिसरात मुसळधार पाऊस झाला. जाऊ (ता.निलंगा) येथील शेतकरी जुबेर हन्ना शेख (वय ३४) हा तरूण शेतकरी सकाळी आपल्या शेताकडे गेला होता. शेतीकाम आटोपून येत असताना वाटेतील ओढ्याला पूर आला होता. अचानक चिखलात पाय घसरून वाहत्या पाण्याच्या लाटेत वाहून गेला. त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनास्थळी तहसीलदार गणेश जाधव, नायब तहसीलदार घनश्याम आडसूळ यांनी भेट देऊन कुटूंबाचे सांत्वन केले. शहरासह तालुक्यातील निटूर, औराद शहाजानी, कासारसिरशी, कासारबालकुंदा, सरवडी, मदनसुरी यासह आदी गावांत पाऊस सुरू असून सोमवारी ढगाळ वातावरण असल्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. शिवाय सध्या पावसाची झड सुरू आहे. प्रारंभी पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना हा पाऊस चांगला असला तरी आणखी मोठ्या पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे.

जर चांगला पाऊस झाला तर जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सूटणार असून तालुक्यातील मध्यम प्रकल्प व लघु प्रकल्पातील पाणीपातळी वाढण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज आहे. निलंगा शहरात जोरदार पाऊस सकाळच्या टप्प्यात झाल्याने बँक काॅलनीकडे जाणारा रस्ता काही काळ वाटेत पाणी साचल्याने व नाली तुंबल्याने बंद होता. तर दापका वेशीमध्येही पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले होते. शहरातील अंतर्गत रस्ते खराब झाल्याने सर्वत्र चिखल दिसत असून नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे जाऊत ओढ्याला पूर आला होता. येथील शेतकरी जुबेर हन्ना शेख वय ३४ हा तरूण शेतकरी सकाळी आपल्या शेताकडे गेला होता. शेतीकाम आटोपून येत असताना वाटेतील ओढ्याला पूर आला होता.

अचानक चिखलात पाय घसरून वाहत्या पाण्याच्या लाटेत वाहून गेला. वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह शोधण्यासाठी तब्बल दोन तास लागले. घटनास्थळी तहसीलदार गणेश जाधव, नायब तहसीलदार, घनश्याम आडसूळ, मंडळआधिकारी श्री. देशमुख यांनी भेट देवून कुटूंबाचे सांत्वन केले व पंचनामा केला आहे. औराद शहाजानी, जामखंडी येथील महामार्गावर असलेला पूल वाहून गेला आहे. त्यामुळे काही काळ वाहतुक ठप्प झाली होती. या पावसामुळे खरिप हंगामातील पिकाला जीवदान मिळाले असले तरी प्रकल्पातील पाणीपातळी वाढण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: 'श्रेयस अय्यर -गंभीरला काढून टाकण्यापेक्षा जरा विचार करा आणि IPL... ', संजय मांजरेकरांची BCCI वर सडकून टीका

Ishwarpur Municipality Politics : गाफील जयंतराव युतीच्या खिंडीत अडकले; जयंत पाटील यांचा 'आनंद' अल्पजीवी ठरला, मुरब्बी राजकारणी कसा राहिला गाफील?

Beed: एटीएमचा स्लॅब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

Kolhapur Police Raid : मुंबई-पुण्यातून आणल्या जायच्या महिला; व्हॉट्सॲप ग्रुप करून वाशीतील लॉजमध्ये सुरू होता वेश्‍याव्यवसाय, हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश

Smartphone Survey: स्क्रीन फुटली,फोन बदलला! ५३% भारतीयांनी खरेदी केला नवीन फोन!

SCROLL FOR NEXT