केज (जि.बीड) : नद्या-नाल्यांना आलेल्या पुराच्या पावसाने मांजरा धरणात येणारा पाण्याचा ओघ वाढल्याने शुक्रवारी (ता.२४) रोजी सकाळी मांजरा धरणाचे बारा दरवाजे उघडले आहेत.  
मराठवाडा

Beed Rain : केजमध्ये मुसळधार पाऊस, 'मांजरा'चे बारा दरवाजे उघडले

रामदास साबळे

केज (जि.बीड) : केज तालुक्यात मागील चार-पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यातच गुरूवारी (ता.२३) रात्री मुसळधार पावसाने संपूर्ण तालुक्याला झोडपून काढले. नद्या-नाल्यांना आलेल्या पुराच्या पावसाने मांजरा धरणात येणारा पाण्याचा ओघ वाढल्याने शुक्रवारी (ता.२४) रोजी सकाळी मांजरा धरणाचे बारा दरवाजे उघडले आहेत.  बारा दरवाजांतून नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असल्याने मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाचे पाणी शेतात शिरल्याने काढणीला आलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मागील चार-पाच दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस सुरु आहे.

त्यातच गुरूवारी रात्री संपूर्ण तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. यामुळे नद्या-नाल्यांना पूर येऊन शेतकऱ्यांच्या खरिपाच्या काढणीला आलेल्या सोयाबीनच्या उभ्या पिकात पूराचे पाणी घुसल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्याची पूर परिस्थिती पाहता महसूल, कृषी व आपत्कालीन यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना देऊन केज विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या केज, अंबाजोगाई व बीड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व विमा मंजूर करण्याची मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी शासनाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT