Umarga Rain Update Sakal
मराठवाडा

Umarga Rain Update : उमरगा तालुक्यात दमदार पाऊस; वीज पडून पाच जनावरे दगावली ; कोरडे नदीपात्र झाले वहाते

झाडाला जेमतेम शिल्लक असलेला आंबा, कांदा, भाजीपाला याच्यासह फळबागेचे नुकसान झाले आहे.

अविनाश काळे

उमरगा, (जि. धाराशिव)  : तालुक्यात जवळपास सर्वच  गावात रविवारी (ता.१२) दुपारी दिडच्या सुमारास वादळी वारा, अवकाळी पावसाने झोडपल्याने  बागायती क्षेत्रासह भाजीपाल्याचे  नुकसान झाले. दरम्यान तालुक्यात पाच ठिकाणी वीज पडून पाच जनावरे दगावली आहेत.

उमरगा शहर, परिसरात जोरदार वारा व मेघगर्जनेसह झालेल्या वैशाखातील पावसाने शनिवारी शहरासह तालुक्यातील तुगाव, मुरुम, डिग्गी, तुरोरी, तलमोड, मुळज, नाईचाकुर, वागदरी, बेडगा, कोरेगांव, मातोळा, नागराळ एकुरगा आदी भागात जोरदार वाऱ्यासह मध्यम पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

झाडाला जेमतेम शिल्लक असलेला आंबा, कांदा, भाजीपाला याच्यासह फळबागेचे नुकसान झाले आहे. दुपारी दिड वाजता सुरु असलेल्या पावसाचा जोर अर्धा तास होता, त्यानंतर अर्धा तास रिमझिम पाऊस झाला. 

वाऱ्यामुळे उमरगा शहरासह ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा कांही तासासाठी खंडीत झाला होता. गेल्या आठ दिवसापासुन ऊन्हाचा पारा वाढला होता. पावसाने नागरिकांना थोडा दिलासा दिला. ११ व २० एप्रिलला अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यात आंब्याच्या आमराईतील आंबा फळाचे प्रचंड नुकसान झाले होते.

रविवारी पुन्हा वाऱ्यामुळे झाडावरील उरले सूरले आंबे झडून गेले. दरम्यान येणेगुर, कोराळ, सुफ्तगाव आदी भागात दमदार पाऊस झाल्याने कांही शेत शिवारात पाणी साचले होते, तर कोरडाठाक पडलेल्या बेन्नीतुरा नदीपात्र वहाते झाले होते.

वीज पडुन पाच जनावरे दगावली

वीज पडून तुगाव शिवारात बाबुराव जामगे यांच्या मालकीची गाय, नागराळ (गुंजोटी) येथील  यांच्या मालकीचा बैल, नाईचाकूर शिवारात महेबुब मुल्ला यांच्या मालकीची एक गाय व वासरू तर बेडगा येथील दयानंद गावडे यांच्या मालकीची म्हैस वीज पडून दगावली आहे.

आठवडी बाजार फुटला !

उमरगा शहराचा रविवारी आठवडी असतो. तालुक्यातील ग्रामीण भागासह शेजारील कर्नाटक राज्यातुन विक्रीसाठी मोठया प्रमाणात भाजीपाला, आंबे मोठ्या प्रमाणात आले होते. मात्र दुपारी झालेल्या दमदार पावसानंतर पुन्हा कांही वेळ रिमझिम पाऊस झाल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. बाजार फुटल्याने ग्राहकांची पंचाईत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT