lohara rain lohara rain
मराठवाडा

Heavy Rain: लोहाऱ्यात तासभर मुसळधार पाऊस

दुपारी पावने पाचच्या सुमारास अचानक वातावरण बदल झाला. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली

नीळकंठ कांबळे

लोहारा (जि.उस्मानाबाद): शहरासह परिसारात सोमवारी (ता.३१) तब्बल सव्वातास अखंडित मुसळधार पाऊस (heavy rain in Osmanabad) झाला. या पावसामुळे शहराजवळील कानेगाव ओढ्याला पूर आला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, शहराती आठ ते दहा जण्यांच्या घरात पावसाचे पाणी घुसून संसरोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.

दुपारी पावने पाचच्या सुमारास अचानक वातावरण बदल झाला. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. पावने पाचच्या सुमारास सुरू झालेला अखंडित मुसळधार पाऊस सहा वाजेपर्यंत होता. ढग पूर्ण अंधारून आले होते. पावसाच्या वेगामुळे जवळचे काहीच दिसत नव्हते. वाहन चालकांना दिवे लावून वाहन चालवावे लागत होते. पावसामुळे सर्वत्र पाणीच-पाणी झाले.

शहराजवळील कानेगाव ओढ्यावरून पाणी वाहाते झाले. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. ओढ्याला पूर आल्याने शेतकरी पैलतीरी अडकून पडली. पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, मुसळधार पावसामुळे शहरातील प्रभाग १४ मधील दहा नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी घुसून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे.

शहरासह मार्डी, बेंडकाळ, नागराळ, मोघा, खेड, माळेगाव, नागूर, कास्ती, कास्ती (खुर्द), लोहारा (खुर्द), वडगाव, भातागळी या भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतशिवारातील सखल भागात पाणी साचले होते. मुसळधार पावसाचा फळबागांना फटका बसला. काही फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या केळी, पपई, आडव्या पडडून नुकसान झाले तर काही गावराने आंबा पिकांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

Wimbledon 2026: यानिक सिनरचा डबल धमाका! सलग दुसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी, ३ तास ४६ मिनिटांचा थरारक सामना...

Medha Manjrekar Cancer: मेधा मांजरेकरांच्या कॅन्सरवर लेक सईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- आई तू खूप...

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

SCROLL FOR NEXT