file photo 
मराठवाडा

परभणीत जोरदार पावसाची हजेरी

कैलास चव्हाण

परभणी : परभणी जिल्ह्या रविवारी (ता. दोन) सायंकाळी सातच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या वेळी वीजपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांची एकच धावपळ उडाली होती. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना धोका निर्माण झाला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तापमानात काही अंशांनी वाढ झाली असली तरी दिवसभर थंडगार वारे सुरू राहिल्याने गारवा कायम राहिला.

 
परभणी शहरात मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने चढ-उतार होत आहे. तापमान कधी दहा अंशांवर, तर कधी १५ अंशांवर पोचत आहे. नेहमीच्या बदलणाऱ्या या वातावरणाचा फटका आरोग्यावर होत आहे. मध्यरात्रीनंतर थंड आणि दुपारच्या वेळी दमटपणा जाणवत आहे. त्यामुळे साथीचे आजार वाढले आहेत.  रविवारी सकाळपासूनच ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. पहाटे अंधारून आले होते, त्यानंतर काही वेळ सूर्यप्रकाश पडला आणि पुन्हा दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झाले दुपारनंतर वाऱ्याची गती वाढली होती. दुपारनंतर  पूर्णपणे अंधारून येत सायंकाळी सात वाजता शहरासह ग्रामीण भागातदेखील हलक्या स्वरूपात पाऊस होता. पावसाचा जोर जिंतूर रस्त्यावरील भागात अधिक होता. १५ ते २० मिनिटे पाऊस सुरू होता. हा पाऊस रब्बी हंगामातील पिकांसाटी धोकादायक ठरणारा आहे. सध्या ज्वारी, हरभरा, गहू ही पिके जोमात आहे. मात्र, अशा अवकाळी पावसाचा फटका या पिकांना बसू शकतो. 


पावसाचे उरुसावर सावट
 राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेला परभणीतील उरुसाला शनिवार (ता. एक) पासून सुरवात झाली. दरम्यान, रविवारी (ता. दोन) सुटीच्या दिवस असल्याने अनेकांनी बच्चेकंपनीसह उरुसात जाण्याचा बेत केला होता. परंतु, रात्री सात वाजता अचानक पावसाने जोरदार हजेरी लावल्याने एकच धावपळ झाली. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने व दुकानांत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली.
परभणीत शेकडो वर्षांची पंरपरा असेलल्या सय्यद शाह तुराबुल हक यांचा उरूस सुरू झाला आहे. १५ दिवस चालणाऱ्या या उरुसात परभणीसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक गर्दी करतात. तर देशभरातून विविध वस्तूंसह खाद्यपदार्थांचे विक्रेतेही यात सहभागी होत असल्याने देशभरात उरुसाची ओळख आहे.

आनंदावर विरजण

रविवार हा सुटीचा दिवस असल्याने या दिवशी नोकरदार वर्ग मोठ्या संख्येने बाहेर पडला होता. रात्री सात वाजता अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. त्यातच वीजपुरवठा खंडित झाला होता. सर्वत्र अंधार झाल्याने मोबाइच्या उजेडात नागरिक वाट काढत होते. सर्वत्र चिखल, पाणी झाले असून दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे विक्रीसाठी आणलेले साहित्य भिजल्या गेले. उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. उरुसाच्या दुसऱ्याच दिवशी पावसाने गोंधळ उडाल्याने अनेकांच्या आनंदावर विरजण पडले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT