file photo
file photo 
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात भल्या पहाटेपासून मेघगर्जनेसह पाऊस, गहु, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात मंगळवारी (ता. २३) भल्या पहाटेपासून मेघगर्जनेसह पाऊस सुरु झाला असून सूर्यदर्शन देखील झाले नसल्याने पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे काढणीस आलेल्या गहु, ज्वारी, हरभरा पिकासह आंबा पिकांचे नुकसान झाले आहे तर हळद काढणीस व्यत्यय आला आहे.

जिल्ह्यात मागच्या चार ते पाच दिवसापासून मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. हवामान खात्याने सांगितल्या प्रमाणे जिल्ह्यात गुरुवार (ता. १८) पासून सकाळ सायंकाळी पाऊस सुरु आहे. मंगळवारी देखील तो सुरु होती. सकाळी साडेपाच वाजल्यापासून मेघगर्जनेसह पाऊस सुरु होता.  हवमान खात्याने मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्याप्रमाणे पाऊस सुरु झाला आहे.

दरम्यान, वसमत शहरासह तालुक्यातील पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, चौंढी तसेच कळमनुरी तालुक्यातील बोल्डा, सिंदगी, पोतरा आदी भागात वाऱ्यासह पाऊस झाला. हिंगोली शहरासह तालुक्यातील बळसोंड, सिरसम, कनेरगाव, आडगाव, खांबाळा, कारवाडी, फाळेगाव आदी गावात देखील मेघगर्जनेसह पाऊस झाला. औंढा नागनाथ शहरासह तालुक्यातील गोळेगाव, साळना, अनखळी, पोटा, उखळी तसेच सेनगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावात मेघगर्जनेसह पाऊस झाला.

अवकाळी पावसाने काढणीस आलेला गहु, हरभरा, ज्वारी या पिकाचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसाच्या उघडझापीने हळद काढणीस व्यत्यय येत आहे. काढणी केलेली हळद शेतकऱ्यांना झाकून ठेवावी लागली आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणावर आंबा झाडाला लगडला आहे. मात्र अवकाळी पाऊस वारे यामुळे झाडाला लगडलेले आंबे देखील गळुन पडत असल्याचे आंबा उत्पादक शेतकरी सांगत आहेत. 

दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यात सर्व दुर पाऊस सुरु असल्याने सकाळी सुर्य दर्शन झाले नाही ढगाळ वातावरण थंडगार हवा यामुळे जिल्ह्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. पावसाची रिपरिप सुरु असल्याने दिवसभर झड सुरु राहणार असल्याचा अंदाज शेतकरी वर्तवित आहेत. शेतातील कामे देखील बंद ठेवावी लागणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, तापाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. अनेक जण खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT