1508850407cover.jpg 
मराठवाडा

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करा ः कुलगुरू

श्याम जाधव


नवीन नांदेड, ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, विद्यापीठ परिसर आणि उपपरिसरातील सर्व शैक्षणिक संकुल, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली आणि कै. श्री उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट येथील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी ‘कोरोना’ (कोव्हिड-१९) विरुद्धच्या लढाईसाठी एक दिवसाचे वेतन मदतीच्या स्वरूपात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी द्यावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी रविवारी (ता. २९) केले.

एक दिवसाचे वेतन
आपला देश आणि राज्य सध्या कोव्हिड-१९ कोरोना व्हायरसच्या अत्यंत गंभीर अशा संकटातून जात आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन कोरोना व्हायरसचा प्रकोप रोखण्याकरिता प्रयत्नशील आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, की आपण आपल्या देशासाठी काहीतरी केले पाहिजे. या भावनेतून आपण सर्वांनी मिळून आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीकरिता द्यावे.

संपर्क ठेवतांना संसर्ग न होण्याची काळजी घ्या
विद्यापीठाने सुरवातीपासूनच स्वच्छतेसंदर्भात विविध उपाययोजना केल्या असून व्हायरसचा प्रकोप एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीद्वारे पसरू नये म्हणून शासनाच्या निर्देशनानुसार प्राचार्य, प्राध्यापक, संशोधक यांनी घरी राहून (वर्क फ्रॉम होम) विभागाचे कामकाज करावयाचे कळविले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी नागरिकांना आवाहन केले.

वारंवार साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुवा, शिंकताना व खोकलतांना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपर धरा, इतरांपासून किमान एक मीटर दूर राहा, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या, फळे, भाज्या न धुता खाऊ नका, तसेच श्वसन संस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क ठेवतांना संसर्ग न होण्याची काळजी घ्या, असे आवाहन केले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठ प्रशासनाने संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Maruti Suzuki Offer: ऑगस्टमध्ये कार खरेदीची मोठी संधी! तब्बल 1.85 लाखांपर्यंत फायदा; Grand Vitara, Balenoसह कोणत्या कारवर किती ऑफर?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर! दिल्लीतील प्रमुख ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

SCROLL FOR NEXT