Mufti Owaisi Kasmi, Ramjan Latur  
मराठवाडा

रमजान महिन्यात गरिबांची चूल पेटवा, मुफ्ती ओवेस कास्मी यांचे मुस्लिम बांधवांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

लातूर ः पवित्र रमजान महिन्यात दानशूर व्यक्ती जकात देतात; पण यावर्षी कोरोना विषाणूच्या संकटामुळे अनेकजण भुकेले आहेत. आपल्याला पोटभरून खायला मिळावे व शेजारी उपाशी राहावा, असे म्हणणारा खरा मुसलमान होऊच शकत नाही. त्यामुळे या संकटाच्या काळात रमजान महिन्यात गरिबांची चूल पेटविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन जमीअत-उलेमा-ए-हिंदचे सरचिटणीस मुफ्ती ओवेस अलीअहमद कास्मी यांनी ‘सकाळ’शी बोलताना केले.


मुस्लिम बांधवांसाठी महत्त्वाच्या असलेल्या रमजान या पवित्र महिन्याला शनिवारपासून (ता. २५) सुरवात होत आहे. कोरोनामुळे सध्या सर्वत्र टाळेबंदी सुरू आहे. सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंधने आहेत. त्यामुळे रमजान महिन्यात धार्मिक कार्यक्रम कसे करावेत, नमाज पठण कोठे करावे, टाळेबंदीची कशी अंमलबजावणी करावी यावर कास्मी यांनी सविस्तर मते मांडली. कोरोनाने जगाला घेरले आहे. वैज्ञानिक, संशोधकदेखील हतबल होत आहेत. विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सतर्कता म्हणून टाळेबंदी हा उपाययोजनेचा एक भाग आहे. सरकारने दिलेल्या सूचनांचे रमजान काळात काटेकोर पालन झालेच पाहिजे. मशिदींमधून इमाम व चार व्यक्तींनाच नमाज अदा करण्याची परवानगी आहे. तरावीची नमाजदेखील तशीच अदा करण्याची परवानगी आहे. त्यामुळे नमाजाच्या वेळी मशिदीत कोणीही गर्दी करून टाळेबंदीच्या नियमाचे उल्लंघन करू नये, असे कास्मी म्हणाले.

लातूरहून बाराशे टन द्राक्षांची निर्यात, टाळेबंदीमध्ये उत्पादकांना दिलासा

इफ्तार पार्टीही घरातच
सर्वांनी घरात बसून कुटुंबासोबतच दररोजची किंवा तरावीची नमाज अदा करायची आहे. घराबाहेर पडायचे नाही. सहर किंवा इफ्तारच्या वेळा मशिदीतील माईकवर सांगता येणार आहेत. याकरिता लोकांनी घराबाहेर पडण्याची गरज नाही. सायरन वाजवायलाही प्रशासनाने परवानगी दिली आहे. इफ्तार पार्टीसाठी कोणीही एकत्र यायचे नाही. घरात बसून कुटुंबासोबतच इफ्तार पार्टी करायची आहे, असेही मुफ्ती ओवेस अलीअहमद कास्मी यांनी सांगितले. आपल्या घरात किंवा परिसरात काही अनियंत्रणीत लोक असू शकतात. अशा लोकांवर समाजातील ज्येष्ठ नागरीकांनी लक्ष ठेवायचे आहे. अशा लोकामुळे समाजाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, असे आवाहनही श्री. कास्मी यांनी केले. या महिन्यात जकात देण्याची प्रथा आहे. दानशूर व्यक्ती जकात देतात. आपल्याला पोटभरून खायला मिळावे व शेजारी उपाशी रहावा असे म्हणणारा खरा मुसलमान होवूच शकत नाही. त्यामुळे सध्याच्या संकटाच्या काळात गरीबाची चूल पेटवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणांना आजपासून मिळणार १५०० रुपये; फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात!

Jaykumar Rawal Photo Viral : व्हॉट्सॲपवर फोटो फॉरवर्ड करताना शंभर वेळा विचार करा! पणनमंत्र्यांचा मॉर्फ फोटो व्हायरल, धुळ्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

SIP Investment: 1 एप्रिलपासून गुंतवणूक सुरू करायची? SIP ठरू शकते तुमची सर्वात मोठी गेमचेंजर! कशी ते समजून घ्या सोप्या शब्दांत

'तिचे केस किती आकर्षक...' प्रियकराकडून मैत्रिणीच्या केसांची स्तुती; प्रेयसी संतापली, संतापजनक घटनेनं मुंबई हादरली

Ashok Kharat Files: ''रुपाली चाकणकरच पीडितांना खरातकडे पाठवायच्या'', महिला नेत्याचे गंभीर आरोप, केली अटकेची मागणी

SCROLL FOR NEXT