फोटो 
मराठवाडा

खासदार हेमंत पाटील यांना आदर्श खासदार पुरस्कार 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : हिंगोली लोकसभा मतदार संघातील जनतेच्या समस्यांना प्राधान्य देऊन सतत पाठपुरावा करत मागण्या मान्य करून घेत आणि या कार्यात सातत्य ठेवून अग्रेसर राहिल्याबद्दल खासदार हेमंत पाटील यांचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटस् आयोजित युवा संसदेच्या वतीने ‘आदर्श खासदार’ पुरस्कार देऊन ता. २९ जानेवारी रोजी पुण्यात गौरव करण्यात येणार आहे. मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. 

हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी खासदार पदाची जबाबदारी स्विकारताच मतदार संघाची ‘विकास हाच एक ध्यास’ डोळ्यासमोर ठेवून कामाला सुरवात केली. आणि अवघ्या आठ महिन्याच्या आत कामाचा आलेख उंचावत गेला मतदार संघातील रेल्वे प्रश्न, उद्योग व्यवसाय, शेतकऱ्यांचे प्रश्न पीकविमा कंपनीकडून होणारी शेतकऱ्यांची लूट आणि अडवणूक, याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारला होता. अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान यासाठी भरीव नुकसान भरपाईची मागणी केली होती. यासह हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योग उभारण्यात यावे. यासाठी केंद्रीय वाणिज्य स्थायी समितीपुढे प्रभावीपणे केलेली मागणी होती. अवघ्या एक महिन्यात हिंगोली येथील एफएम केंद्राला मंजूरी मिळून काम मार्गी लागले. हिंगोली येथे ५० खाटांचे आयुष रुग्णालय उभारावे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन प्रभावीपणे मागणी मांडली होती.

राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर मार्गी लावावे

हिंगोली लोकसभा मतदार संघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर मार्गी लावावे व प्रकल्पग्रस्तांना मावेजा तात्काळ देण्यात यावा याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यासोबत चर्चा केली. मतदार संघाच्या या विकास कामाचा धडाका लावून संसदेच्या आतापर्यंत झालेल्या सर्वच अधिवेशनात नित्यनेमाने हजेरी लावून संस्कृत भाषा टिकण्यासाठी त्यावर अभ्यासपूर्ण मांडणी केली होती. स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण कामगिरी केलेल्या सर्वच घटकांची जपवणूक करण्यासाठी उपस्थित विधेयकावर अभ्यासपूर्ण मांडणी केली, मतदार संघात शेतमालाच्या साठवणूक करण्यासाठी उच्च क्षमतेचे शीतगृहे उभारावे. 

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा पुढाकार

हिंगोली, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई, दिल्ली व देशाच्या इतर भागात ये - जा करण्यासाठी नांदेड विमानतळाहून विमानसेवा नियमित करण्यात यावी. यासह अनेक मागण्या मांडून मंजूर करून घेतल्या आहे. हा एवढा कामाचा आलेख केवळ अवघ्या आठ महिण्याच्या असून संसदेत नियमित उपस्थित राहून प्रभावीपणे मांडल्या आहेत. खासदार हेमंत पाटील यांच्या याच कार्याची दखल पुणे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस यांनी घेऊन येत्या ता. २९ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या पाचव्या युवा संसद कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श खासदार पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे. 

कर्तव्यदक्ष व जनतेचा लोकप्रिय खासदार

जाधवर ग्रुप ही संस्था मागील अनेक वर्षापासून लोकप्रतींनिधींच्या कार्याची दखल घेवून त्यांना कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करत असते. यंदाच्या पुरस्कारासाठी त्यांनी खासदार हेमंत पाटील यांची निवड केली आहे. अवघ्या काही दिवसात मतदार संघात खासदार हेमंत पाटील यांची कर्तव्यदक्ष व जनतेचा लोकप्रिय खासदार म्हणून ओळख निर्माण झाली. आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन खासदार हेमंत पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबाबद्दल मतदार संघात आनंद व्यक्त होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: पावसामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर

Plane Service : इराण युद्धाचा विमानसेवेला फटका; दहा हजार आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

Chhatrapati Sambhajinagar: गॅससाठी नागरिकांच्या रांगा कायम; आठ दिवसांत प्रश्न सुटू शकतो, पण पुरवठा वाढवा ः एजन्सी

Mugdha Karnik Controversy: अभिनेत्री मुग्धा कर्णिक यांनी माफी मागावी; श्री विठ्ठल भक्तांविषयी वादग्रस्त वक्तव्य, मंदिर समितीचे पत्रक प्रसिद्ध!

Chhatrapati Sambhajinagar: कांदा अवघा ७०० रु. क्विंटल; शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना, हमीभाव देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT