rain-o.jpg
rain-o.jpg 
मराठवाडा

नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरू असलेला पाऊस गुरुवारी (ता. 19) मध्यरात्री जोरदार झाला. हा पाऊस विदर्भालगतचे तालुके वगळता इतर तालुक्यात दमदार झाला. या पावसामुळे अर्धापूर व लिंबगाव मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शुक्रवारी (ता. 20) सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण 405.4 मिलिमीटर नुसार सरासरी 25.32 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आजपर्यंत 711.19 मिलिमीटरनुसार 74.42 टक्के पाऊस झाला आहे.

नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे मंगळवारी झालेल्या पावसानंतर गुरुवारी बुधवारी मंदावलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला गुरुवारी (ता. 19) रात्री दहापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस विदर्भालगतचे तालुके वगळता उर्वरित तालुक्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे नांदेड तालुक्यातील लिंबगाव मंडळात 81 मिलिमीटर तर अर्धापूर मंडळात 85 मिलिमीटर पाऊस झाल्याने याठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. हा पाऊस नांदेड शहर 38, तुप्पा 39, विष्णुपुरी 44, वसरणी 45, वजीराबाद 45, नांदेड ग्रामीण 23, तरोडा 28,  दाभड 30, मालेगाव 34, जारीकोट 27, मालेगाव मक्ता 28, शहापूर 21, मुदखेड 39, बारड 63, भोकर 27, किनी 26, मोघाळी 32, मातुळ 35, चांडोळा 45, मुक्रमाबाद 44, उमरी 28, शिंधी 58, गोळेगाव 44, कुंडलवाडी 24, आदमपुर 27, लोहगाव 24, बिलोली 22, कंधार 53, उस्माननगर 35, बारुळ 22, पेठवडज 31, फुलवळ 34, कुरुळा 43, नायगाव 23,  नरसी 24, मांजरम 41, बरबडा 42, लोहा 45, कलंबर 35, शेवडी 24, सोनखेड 29 व कापशी मंडळात 40 मिलिमीटर पाऊस झाला या पावसामुळे छोट्या नदी नाल्यांना पाणी आले आहे.
 

तालुकानिहाय झालेला पाऊस
नांदेड 42.75, मुदखेड 39.67, अर्धापूर 49.67, भोकर 30, उमरी 43.33, कंधार 36.33, लोहा 31, किनवट 3.80, माहूर 9, हदगाव 9.80, हिमायतनगर 8.67, देगलूर 15.83, बिलोली 21.80, धर्माबाद 16.33 नायगाव 27.80, मुदखेड 19.14 मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात 405.04 मिलीमीटरनुसार सरासरी 25.32 मिलीमीटर पाऊस झाला. आजपर्यंत 711.19 मिलिमीटरप्रमिणे 74.42 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT