Highway
Highway 
मराठवाडा

महामार्ग विस्तारू लागला

आदित्य वाघमारे

औरंगाबाद - शहराजवळून जाणाऱ्या झाल्टा-करोडी आणि करोडी-तेलवाडी या ८५  किलोमीटरच्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. तीस महिन्यांच्या कालावधीत या रस्त्याची उभारणी करण्यात येणार असून, त्याचा खर्च तब्बल १,५०० कोटींच्या घरात आहे. 

धुळे-सोलापूर एनएच- ५२ चा भाग असलेल्या औरंगाबाद (झाल्टा)-करोडी-तेलवाडी सेक्‍शनच्या रस्त्याच्या विस्तारीकरणाला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) आरंभ केला आहे. एल अँड टी या कंपनीने या कामाची निविदा पटकावली असून, पावसाळ्याचा कालावधी संपतानाच या कामाला सुरवात झाली आहे. 

औरंगाबाद शहरात बीड बायपासवरून येणारी वाहतूक शहराबाहेर वळविण्यासाठी याअंतर्गत एक बायपास तयार केला जात आहे. झाल्टा फाटा येथून निघणारा हा बायपास एसआरपी केंद्र सातारा, वाल्मी, विद्यमान वळणरस्ता ओलांडून पहिल्या टप्प्यात करोडीपर्यंत जाणार आहे. येथून तेलवाडीपर्यंत जाणाऱ्या पुढील टप्प्यासाठी काही ठिकाणी जुन्या रस्त्याचा भाग वापरून, तर काही ठिकाणी नव्याने जमीन अधिग्रहण करून रेखांकन अंतिम केले आहे. त्यानुसार अनेक ठिकाणी पूल, पाइपलाइन हलविणे, जमिनीचे आवश्‍यक सपाटीकरण, झाडे तोडणी आणि बांधकामे हटविण्याचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्यावर सुमारे पन्नास हजार वाहनांचा भार राहणार असल्याचे प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले. कामादरम्यान सुमारे पाच हजार झाडे तोडण्यात येणार असून, त्याच्या पाचपट झाडे याच रस्त्यालगत लावली जाणार असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले.

कुठे सहा; तर कुठे चार पदरी 
महामार्गालगत अनेक ठिकाणी दाट नागरी वस्त्या आणि गावे आहेत. या ठिकाणी सर्व्हिस रोडच्या कामासाठीची तजवीज करण्यात आली आहे. त्यामुळे हा रस्ता काही ठिकाणी चार, तर काही ठिकाणी सहा पदरी होईल. गावांना अपघाताच्या धोक्‍यापासून लांब ठेवण्यासाठी या रस्त्यालगत जाळ्याही बसविण्यात येणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT