फोटो 
मराठवाडा

हिमायतनगरचा तलाठी लाचेच्या जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शेतीचा फेरफार करून सातबाराला नोंद घेण्यासाठी हिमायतनगरचा लाचखोर तलाठी १५ हजाराची लाच घेतांना शनिवारी (ता. २१) डिसेंबर रोजी त्याच्या खासगी कार्यालयात रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. 

हिमायतनगर सज्जाचे तलाठी रामचंद्र मच्छींद्रनाथ पुरी कार्यरत होते. यावेळी हिमायनतर येथील एक तक्रारदार आपल्या नावावर असलेली शेती मुलाच्या नावे करून त्याचा फेरफार व सातबाराला नोंदीसाठी तलाठी कार्यालयात गेले. कार्यालयातील तलाठी रामचंद्र पुरी यांना याबाबतचे सर्व कागदपत्र तयार करून दिले. मात्र लाचखोर तलाठी श्री. पुरी याने या कामासाठी तक्रारदाराकडे २० हजाराची लाच मागितली. परंतू ही लाच देण्याची इच्छा नसतांना तडजोडअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. 

एसीबीचा सापळा यशस्वी

परंतु तक्रारदाराने थेट नांदेड गाठून ता. १२ डिसेंबर रोजी लाचलुचत प्रतिबंधक विभागात जावून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन ता. १७ डिसेंबर रोजी एसीबीने पडताळणी सापळा. यात शनिवारी (ता. २१) रोजी १५ हजार रुपये घेण्याचे निष्पन्न झाले. त्यावरून लाचलुचपतचे एक पथक शनिवारी (ता.२१) हिमायतनगर येथे असलेले तलाठी याचे खासगीकार्यालय परिसरात सापळा लावला. दुपारी दोनच्या सुमारास लाचखोर तलाठी पुरी याला १५ हजार रुपये घेताना रंगेहात पकडले.
 
लाचखोर तलाठी पुरीवर गुन्हा दाखल 

पोलिस निरीक्षक राहूल पखाले यांच्या फिर्यादीवरुन हिमायतनगर पोलिस ठाण्यात तलाठी मच्छींद्र पुरी याच्याविरूध्द लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस अधिक्षक कल्पना बावकर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, पोलिस उपाधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहूल पखाले, कर्मचारी बालाजी तेलंगे, हनुमंत बोरकर, गणेश तालकोकुलवार, गणेश केजकर, नरेंद्र बोडके यांनी परिश्रम घेतले. 

नागरिकांना आवाहन

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की, शासकिय अधिकारी, कर्मचारी हे शासकिय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवक यांचे एसएमएस किंवा व्हिडिओ, आॅडीओ क्लीप असल्यास भ्रष्टाचार संबंधाने काही माहिती असल्यास किंवा माहिती अधिकारात शासकिय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी शासकिय निधीचा भ्रष्टाचार केला असेस तर टोलफ्री हेल्पलाईन क्रमांक - १०६४ किंवा कार्यलय फोन क्रमांक ०२४६२-२५३५१२ यावर किंवा मोबाईल - ८९७५७६९९१८ वर संपर्क साधावा. 
विजय डोंगरे, पोलिस उपाधिक्षक, एसीबी, नांदेड.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुणी गॅस देता का गॅस? मुंबईत ४-५ किमीपर्यंत रांगा, पुण्यात पहाटेपासून लोक रांगेत; काळ्याबाजारात एक किलोसाठी ५०० ते ७०० रुपये

Breaking: IPL 2026 चं वेळापत्रक बदलणार? RCB चे सामने एम चिन्नास्वामीवर होणार की नाही? आले मोठे अपडेट्स

LPG चं टेन्शन तर काहीच नाही..अजून खरा बॉम्ब ब्लास्ट आहे बाकी; 1 एप्रिलपासून तुमच्या खिशाला लागणार युद्धाची झळ, 'या' 15 वस्तू महागणार

'वीण दोघांतली ही तुटेना'च्या सेटवर पुलाव तर तुला जपणार आहेच्या सेटवर चुलीवरचं जेवण, चहा सुद्धा केला बंद!

Latest Marathi Update : युद्धाचा परिणाम झेंडू बाजारावर; दर घसरल्याने शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT