parbhani sakal
मराठवाडा

Parbhani : आव्हाडांविरोधात हिंदुत्ववादी संघटना संतप्त

वसमत येथे विहिंपकडून ‘जोडे मारो’ आंदोलन, जवळा बाजारात प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

सकाळ वृत्तसेवा

वसमत : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शुक्रवारी ता. ५ जाहीर निषेध करण्यात आला. आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनही देण्यात आले.

तीन जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांना मांसाहारी संबोधून संत महंत तसेच हिंदूंच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले. आदर्श पुत्र, आदर्श पिता, आदर्श पती, आदर्श भाऊ व आदर्श राजा अशा सर्वच बाबतीत आदर्श असलेल्या श्रीरामाचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करावी अन्यथा त्यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषद रस्त्यावर उतरेल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनावर गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज, गणेश काळे, प्रकाश शहाणे, साईनाथ पतंगे, संदिप गोरे, सोपान काळे, देवानंद गौड, अतिश अग्रवाल यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जवळा बाजार येथे आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

जवळा बाजार : येथे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा शुक्रवारी (ता. ५) भाजपच्या वतीने निषेध करून प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ३ जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा येथील बस स्थानक परिसरात सकाळी अकरा वाजता आंदोलन करून निषेध करण्यात आला.

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती अंकुश आहेर, मुदंडा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सोमानी, प्रा. प्रल्हाद कदम, उपसरपंच गणेश गाढवे, ग्रामपंचायत सदस्य निळू अंभोरे, नागनाथ राखे, सजंय सोमाणी यांच्यासह असंख्य भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT