हिंगोलीत महाआघाडीत बिघाडी 
मराठवाडा

हिंगोली झेडपीत खळबळ : शिक्षण सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर

हिंगोली जिल्हा परिषदेत ५२ सदस्य असून त्यापैकी दोन जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी, शिवसेना. काँग्रेस आघाडीची सत्ता आहे.

राजेश दार्वेकर

हिंगोली : येथील जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्याच सदस्यांनी राष्ट्रवादीच्या शिक्षण सभापती विरोधात बुधवारी (ता. नऊ) ३५ विरुध्द शुन्य मतांनी अविश्वास ठराव पारित केला आहे. यावेळी १५ सदस्य गैरहजर राहिले होते.

हिंगोली जिल्हा परिषदेत ५२ सदस्य असून त्यापैकी दोन जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी, शिवसेना. काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. मागील काही दिवसांपुर्वीच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर जानेवारी २०२० मध्ये सभापतीपदासाठी निवड झाली होती. त्यानंतर जुलै २०२० रोजी शिक्षण सभापतीपद राष्ट्रवादीच्या रत्नामाला चव्हाण यांच्याकडे देण्यात आले होते. तर कृषी सभापतीपद काँग्रेसचे बाजीराव जुमडे यांना देण्यात आले होते. शिक्षण सभापतीचा पदभार घेतल्यानंतर रत्नमाला चव्हाण यांनी सदस्यांना विश्वासात न घेता कामे करणे यासह इतर आरोप केले जात होते. नंतर राष्ट्रवादीच्याच सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये शिवसेना व काँग्रेसच्या सदस्यांनी देखील मदत केली होती.

हेही वाचा - उमरखेडच्या कुटीर रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर- हेमंत पाटील

बुधवारी (ता. नऊ) अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सदस्यांची बैठक झाली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी उपस्थित होते. यावेळी सभागृहात ३५ सदस्यांची उपस्थिती होती. यामध्ये शिवसेनेचे ११, काँग्रेसचे १०, राष्ट्रवादीचे १०, दोन अपक्ष तर दोन भाजपाच्या सदस्यांच्या समावेश होता. यावेळी झालेल्या चर्चेत उपस्थित असलेल्या ३५ सदस्यांनी विश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे अविश्वास ठराव ३५ विरुध्द शुन्य मतांनी पारित झाला आहे. या मुळे राजकीय चर्चेला उधाण आले होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT