file photo 
मराठवाडा

हिंगोली- रिसोड मार्गावर अपघात, शिक्षकाचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर 

विठ्ठल देशमुख

सेनगाव (जिल्हा हिंगोली) : हिंगोली - रिसोड राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालकाचा ताबा सूटल्याने तळनी फाट्याजवळील वळणाच्या ठिकाणी झालेल्या अपघातात  बुधवारी (ता. चार) रात्री एका शिक्षकाचा जागीच मृत्यु झाला व अन्य दोन जन गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हिंगोली - रिसोड या राष्ट्रीय महामार्गावर चालकाचा ताबा सूटल्यामुळे मारोती कंपनीची (एम.एच.०१ सी.डी.६७७९) या नंबरची ऐरटीका गाडी तळणी फाट्यावर वळणाच्या रस्त्यावरुन खाली गेली. वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे एक चाकसुध्दा तूटून बाजूला शेतात पडले. ही गाडी सुध्दा रस्त्याच्या बाजूला एका शेतातील नाल्यात मोडतोड होऊन पडली. 

ही गाडी हिंगोली येथून सेनगाव मार्गे भरधाव वेगाने येत होती. परंतु चालकाचा ताबा सुटल्यामुळे तळणी फाट्यावरील वळणाच्या रस्त्यावर ही धक्कादायक घटना  बुधवारी रात्री सात वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये सेनगाव तालुक्यातील कवरदडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक लिंबाराव कुंदर्गे (वय ४२) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. तर यांच्यासोबत असलेले अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान लिंबाराव कुंदर्गे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व आई असा त्यांचा परिवार आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर व कवरदडी गावावर शोककळा पसरली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola: कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग; २९ हजारांवर कर्जखाती अपलोड; अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

Tukaram Mundhe Energy Drink Action : पेप्सिको, रेड बुल, स्टिंगसारख्या कंपन्यांना तुकाराम मुंढेंचा तगडा दणका; 'एनर्जी ड्रिंक' शब्द लिहल्यास थेट कारवाई

Latest Marathi Live Update: गेल्या २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Viral Video : पुण्यात झाडांना भर पावसात टँकरने पाणी... व्हिडिओ व्हायरल, पण सत्य काय?

Kolhapur Rain Update : राजारामसह सात बंधारे पाण्याखाली, कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला; धरणक्षेत्रात कोसळधार, पंचगंगेची पातळी किती फुटांवर?

SCROLL FOR NEXT