file photo 
मराठवाडा

हिंगोली : परभणी येथील कोवीड सेंटरमधून पळालेला आरोपी बासंबा पोलिसांनी पकडला

राजेश दारव्हेकर

हिंगोली : परभणी येथील कोवीड सेंटर मधून पळालेल्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी विकास गोविंदपुरे यास हिंगोली तालुक्यातील पारडा शिवारातून बासंबा पोलिसांच्या पथकाने बुधवारी (ता. दोन ) सकाळी अटक केली असुन आता त्याला   परभणी पोलिसांच्या ताब्यात दिले  जाणार आहे . 

हिंगोली तालुक्यातील पारडा शिवारात  सात महिन्यापुर्वी जादूटोणा करण्याच्या कारणावरून शंकर अलझेंडे यांचा खून झाला होता . या प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता . बासंबा पोलिसांच्या पथकाने विकास गोविंदपुरे , बाळू तोरकड , विकास तोरकड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती . तेव्हा पासून विकास गोविंदपुरे हा परभणीच्या कारागृहात होता. दरम्यान, त्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यास कोवीड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. 

अन्य दोघे जण फरार

मात्र संधीचा गैरफायदा घेत विकास गोविंदपुरे व अन्य दोघे जण फरार झाले होते . या प्रकरणाची माहिती परभणी पोलिसांनी बासंबा पोलिसांना दिली अधिक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, उपाधिक्षक रामेश्वर बैंजने यांच्या मार्गदर्शनाखाली बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लु , सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मगन पवार यांच्या पथकाने मंगळवारी ( ता. एक ) सायंकाळ पासून पारडा शिवारात शोध मोहिम सुरु केली होती. 

परभणी पोलिसांच्या हवाली केले जाणार

त्यानंतर बुधवारी सकाळी  तो एका शेतात लपून बसल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी  टाकलेल्या वेढ्यात तो अडकला . व तो पोलिसांच्या हवाली झाला . त्याला कोरोनाची लागण असल्याने पोलिसांनी त्यास सामाजिक अंतर पाळत अटक केली आहे. त्याला परभणी पोलिसांच्या हवाली केले जाणार असल्याचे बासंबा पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT