Hingoli  sakal
मराठवाडा

Hingoli : हिंगोलीत साडेपाच लाखांचा गुटखा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन जणांवर गुन्हा दाखल, एक फरार

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील पेन्शनपुरा भागात एका घरावर छापा टाकून केलेल्या कारवाईत पाच लाख ६९ हजार ३६० रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी दोघांवर शहर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात एकाला ताब्यात घेतले असून, एकाचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पेन्शनपुरा भागात एका घरात पानमसाला, तंबाखू व गुटख्याची पोते साठवणूक केल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, राजेश मलपिल्लू, शिवसांब घेवारे, जमादार सुनील अंभोरे, गजानन पोकळे, राजू ठाकूर, नितीन गोरे, विशाल खंडागळे, संभाजी लकुळे, किशोर सावंत, रविना घुमनर यांच्या पथकाने मंगळवारी रात्री पेन्शनपुरा भागात तपासणी सुरू केली होती.

यामध्ये युनूसखॉं पठाण याच्या घरात गुटखा व सुगंधित तंबाखू असल्याची माहिती मिळाली. नंतर पोलिसांनी सदरील घरावर छापा टाकला असता घरात जवळपास पाच लाख ६९ हजार ३६० रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखू आढळून आली.

या प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक गोपीनवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात युनुसखॉं जब्बारखॉं पठाण व वसीमखॉं जब्बार खॉं पठाण या दोघांवर बुधवारी गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी युनुसखॉं यास ताब्यात घेतले असून, वसीमखॉं मात्र फरार आहे. त्याच्या अटकेनंतरच हा गुटखा व तंबाखू कोठून खरेदी केली, याची माहिती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

Tata Sons N Chandrasekaran : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून वाद; चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा विरोध

'खीर बनवणाऱ्यालाच आधी चाखावी लागते!' ‘सूर्यवंशम’चा उल्लेख करत गौरव कपूरने बिग बींची घेतली फिरकी, Viral Video

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये लाचखोरीप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह तिघांना अटक

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

SCROLL FOR NEXT