file photo 
मराठवाडा

 हिंगोलीत खळबळ : पोलिस निरीक्षकाचा कोरोनाने घेतला बळी

राजेश दारव्हेकर

हिंगोली : येथील राज्य राखीव दलाचे पोलिस निरीक्षक कुंडलिक अंभोरे यांचा बुधवारी (ता.२३) सायंकाळी औरंगाबाद येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ते औंढा नागनाथ तालुक्यातील गलांडी येथील रहिवासी होते.

येथील राज्य राखीव बल गट क्रमांक १२ चे पोलीस निरीक्षक कुंडलिक अंभोरे यांना मागील आठवड्यात कोरोना संसर्ग झाला होता. त्यांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते .त्यांनी पन्नाशी ओलांडली होती. त्यामुळे उपचाराला प्रतिसाद देत नव्हते, अखेर  त्यांचा कोरोनाने बळी घेतल्याने राज्य राखीव दलात शोककळा पसरली आहे.

राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते

कुंडलिक अंभोरे हे औंढा तालुक्यातील गलांडी येथील रहिवासी होते. त्यांचा सेवानिवृत्तीचा काळ ही अवघा सहा वर्षे बाकी होता. त्यांनी उत्कृष्ट सेवा बाजावल्यामुळे त्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी ते पात्र देखील ठरले होते. विशेष म्हणजे येणाऱ्या कालखंडात त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते. मात्र राष्ट्रपती पुरस्कार न स्वीकारताच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी खूप अडचणीवर मात करीत राज्य राखीव दलात भरती झाले.

पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार

त्यांचा स्वभाव मनमिळावू असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यासोबत कोणताही रुबाब न दाखवीता मन मोकळे पणाने वागत असत, अधिकारी, कर्मचारी देखील त्यांच्यावर एखादया कुटुंबासारखे प्रेम करीत होते. गरीब परिस्थितीवर मात करीत अख्या कुटुंबाचा गाडा सांभाळत होते. मात्र त्यांनी कोरोनावर मात करू शकले नाहीत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. कोविड योद्धा निघून गेल्याने राज्य राखीव दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी अंभोरे यांच्या दुःखात सहभागी झाले आहेत. गुरुवारी औरंगाबाद येथे महापालिकेच्या वतीने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संपादन -प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WOMEN'S ASIA CUP 2026 FINAL: पाकिस्तानचा पत्ता कट अन् भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान! महिला एशिया कप फायनल कधी, कुठे आणि किती वाजता?

CM Devendra Fadnavis : विदर्भ बनणार ‘मायनिंग-ग्रीन स्टील हब’; खाण क्षेत्र अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Marathi News Live Updates : पुण्याजवळ पाबे घाटात ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

SCROLL FOR NEXT