file photo 
मराठवाडा

हिंगोली : बिजभांडवल योजनेसाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन

राजेश दारव्हेकर

हिंगोली :  जिल्ह्यात संत रोहीदास चर्म उद्योग व चर्मकार महामंडळांतर्गत कर्जासाठी मागणी करणाऱ्यांसाठी आता जिल्हा कार्यालयामध्ये १६ उद्दीष्ट प्राप्त झाले असून कर्जाची आवश्यकता असलेल्यांनी अर्ज करावे असे संत रोहीदास चर्म उद्योग व चर्मकार महामंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. 

संत रोहिदास चर्म उद्योग व चर्मकार महामंडळ  जिल्हा कार्यालय , हिंगोलीसाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजनेंतर्गत  बिजभाडवल  योजनेंतर्गत २० व  १६ चे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे . या दोन्ही योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात . चांभार समाजाअंतर्गत असणाऱ्या चांभार , ढोर , मोची , होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत . या समाजातील लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा . 

अर्जदारांनी महामंडळाच्या नियमाप्रमाणे महामंडळाच्या विहित नमुन्यात अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत संत रोहिदास चर्म उद्योग व चर्मकार महामंडळ ( मर्या . ) जिल्हा कार्यालय , डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन  या ठिकाणी स्वतः अर्जदाराने मुळ कागपत्रासह उपस्थित राहून दाखल करावेत . त्रयस्थ व मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाहीत . राबविल्या अर्जदारांनी अर्जासोबत जातीचा असणाऱ्या दाखला अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा प्रस्ताव दाखला   पासपोर्ट महामंडळाच्या साईज फोटोच्या तीन प्रती ,  अर्जदाराचा शैक्षणिक दाखला , राशन कार्ड झेरॉक्स प्रत, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा, आधार कार्ड , मतदान कार्ड , पॅन कार्ड झेरॉक्स प्रत ,  व्यवसायाचे दरपत्रक आहे त्या जागेची भाडेपावती , करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा ( नमुना न .८ ) लाईट बील , टॅक्स पावती  बीज भांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल, वाहनासाठी लायसन्स , परवाने बॅच  व्यबसायाचे ग्रामपंचायत,  न.पं . यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, अनुदान न घेतल्याबाबत शंभर रुपयाच्या बॉन्डवर प्रतिज्ञापत्र हे सर्व कागदपत्रे स्वयंसाक्षांकीत करुन घोषणापत्र देण्यात यावे .

हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील घेतलेला चांभार , ढोर , मोची , होलार या समाजातील उत्पन्नाचा बेरोजगार युवक - युवतींनी तसेच होतकरु गरजू अर्जदारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा , असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक हिरालाल गतखणे यांनी केले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हो की नाही एवढंच बोला! मला बोलायचंय म्हणणाऱ्या वाल्मिक कराडला कोर्टानं फटकारलं; सुनावणीत काय घडलं?

Team India WTC Final Scenario: टीम इंडिया फायनलमध्ये जाणार की नाही? ICC ने सोपं गणित मांडून गुंता सोडवला की वाढवला?

Jalgaon Gold And Silver Price : खिसा रिकामा होणार! डिसेंबरच्या २१ दिवसांतच सोने ५५०० रुपयांनी तर चांदी २७ हजारांनी महागली

Viral Video: इथं कधीही फोटो काढू नका… क्षणात गिळंकृत करणारा पृथ्वीवरील जीवघेणा स्पॉट, इथं उभं राहणंही धोकादायक

Maharashtra’s Traditional Jewelry: महाराष्ट्रातील पारंपरिक दागिने तुम्हाला माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT