Crop Insurance sakal
मराठवाडा

Hingoli: पीकविम्याचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा

कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : प्रधानमंत्री विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलै पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे. राज्यात खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यासाठी क्लस्टरनिहाय विमा कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय-लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. खरीप हंगामात खरीप ज्वारी, तूर, मूग, उडीद, कापूस व सोयाबीन या पिकांना विमा संरक्षण उपलब्ध आहे. यामध्ये खरीप ज्वारीसाठी संरक्षित रक्कम ३० हजार रुपये असून, शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम ६०० रुपये आहे. सोयाबीन पिकासाठी संरक्षित रक्कम ५५ हजार रुपये असून, भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम १,१०० रुपये आहे. मुगासाठी संरक्षित रक्कम २२ हजार रुपये असून, भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम ४४० रुपये आहे. उडदासाठी संरक्षित रक्कम २२ हजार रुपये असून, विमा हप्त्याची रक्कम ४४० रुपये आहे.

तूर पिकासाठी संरक्षित रक्कम ३६ हजार ८०२ रुपये असून, विमा हप्त्याची रक्कम ७३६.०४ रुपये आहे. कापूस पिकासाठी संरक्षित रक्कम ५५ हजार रुपये असून, भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम २,७५० रुपये आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हवामानातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, दुष्काळ, पावसातील खंड, पूर, क्षेत्र जलमय होणे, कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट आणि चक्रीवादळ, नैसर्गिक आपत्ती या बाबींमुळे होणाऱ्या पीक नुकसानीसाठी विमा कवच आहे. यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान इत्यादी बाबींचाही समावेश आहे.

विमा पोर्टल सुरू

पीक विमा हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल (pmfby.gov.in) सुरु करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३१ जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात अर्ज करुन पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT