file photo 
मराठवाडा

हिंगोली : कला ही मुलांना स्वतः च्या पायावर उभं करते- चित्रकार शिवराज जगताप

पंजाब नवघरे

वसमत (जिल्हा हिंगोली) : सध्याच्या काळात तुम्हाला तुमची कलाच टिकवून ठेवू शकते. ज्याला चांगल गायन, चांगलं वादन येतं, चांगली चित्र काढता येतात, घर नीटनेटके ठेवता येत, झाडं लावून ती जगविण्यासाठी छंद लागतो त्यांना कोरोनाच काय कुठलाही रोग आला तर त्यांच्या शरीरात आपोआप अँटिबॉडीज तयार होतात आणि त्या रोगविरुद्ध लढण्यासाठी त्यांचं शरीर साथ देत असत म्हणून आपल्या आवडीची एखादी तरी कला आपण जोपासली पाहिजे असे मत चित्रकार शिवराज जगताप यांनी व्यक्त केल.

चित्रांतील डोळे हे चित्रकाराला बोलले पाहिजे एव्हढी कला माणसाला तल्लीन करीत असते. कोणतीही कला तिची जोपासना केली की ती जमते. फक्त आवड निर्माण करा, चित्रकला ही तर जिवंत माणसाला समाधिस्त बनवीत असते, तुम्हाला एखादं चित्र मला जमलं नाही, मला जमत नाही, असं म्हणू नका आपण पहिल्यांदा काढलेलं एखादं चित्र आता खूप दिवसांनंतर, खूप वर्षानंतर पाहिलं तर आपल्याला हसू येत. मीही तसाच होतो आज माझे चित्र चीन , जपान, थायलंडच्या अनेक म्युझियममध्ये लागले आहेत.

कोण आहेत शिवराज जगताप चित्रकार
       
चित्रप्रदर्शनात सहभाग- ग्रीस, पोलंड, फ्रांस, तुर्की, दुबई ,कॅलिफोर्निया, चायना इ.

चायना येथील जगप्रसिद्ध झियान म्युझियममध्ये तीन चित्रांचा समावेश. ते स्वतःआंतरराष्ट्रीय वॉटर कलर सोसायटी सदस्य आहेत. 
कष्ट माणसाला खूप मोठे करतात त्याला प्रेरना देत चला सुरुवात साधी आणि छोटी असली पाहिजे.
 
मुलं भविष्यातील अनेक मोठं- मोठाली कलावंत होतील आणि आनंदी जीवन जगतील असा मला विश्वास आहे. या ऑनलाइन चित्रकला छंद वर्गासाठी तंत्रज्ञ म्हणून शाळेचे मुख्याध्यापक गोविंद दळवी यांनी काम पाहिले. या ऑनलाईन चित्रकला छंद वर्गासाठी शाळेमधून जवळपास दीडशे विध्यार्थी सहभागी झाले होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dam Water Level Rises : खडकवासला धरण वेगाने भरतंय... पुढचे काही तास ठरणार निर्णायक? प्रशासनाने नागरिकांना दिला महत्त्वाचा इशारा

मोठी बातमी! माध्यमिक शाळांमध्ये आता कला-क्रीडा-संगीत शिक्षकांची भरती; राज्यात यंदा १८ हजार शिक्षकांची भरती; रिक्त पदे अपलोड करायला १० जुलैपर्यंत मुदत

उजनीत ८१ हजार क्युसेकची आवक! पुण्यातील पश्चिम घाटमाथ्यावर दमदार पाऊस, 3 दिवसांत ‘प्लस’मध्ये येण्याची शक्यता; गतवर्षी धरण 27 मे रोजी प्लसमध्ये, वाचा....

Daliya Laddu Recipe:फायबरने भरपूर अन् पचायला हलके , १५ मिनिटांत तयार करा पौष्टिक दलियाचे लाडू

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

SCROLL FOR NEXT