aundha nagnath sakal
मराठवाडा

Hingoli : महाशिवरात्रीसाठी शिवालये सज्ज

औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, वेरूळमध्ये भाविकांना पर्वणी

सकाळ वृत्तसेवा

औंढा नागनाथ : येथील नागनाथ मंदिरात गेल्या काही दिवसांपासून महाशिवरात्र उत्सव सुरू झाला आहे. शनिवारी (ता.१८) महाशिवरात्रीदिनी होणाऱ्या विविध कार्यक्रमांची जय्यत तयारी झाली आहे. दरम्यान, परळी (जि. बीड) येथील प्रभू वैजनाथ, वेरूळ (जि. औरंगाबाद) येथील घृष्णेश्वर मंदिरातही तयारी पूर्ण झाली असून लाखो भाविकांची मांदियाळी असेल.

नागनाथ मंदिर आकर्षक रोषणाईसह फुलांचे तोरणांनी सजले आहे. देवस्थान व पुरोहित संघाकडून नागनाथ प्रभूला आज दुग्धाभिषेक करून महापूजा करण्यात आली. देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, दत्तमठाचे महंत शाम गिरी, पुरोहित संघाचे अध्यक्ष कृष्णा ऋषी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

देशभरातील येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने शुद्ध पाण्याची व्यवस्था असून महाप्रसाद वाटप होणार आहे. पोलिस कक्ष, आरोग्य कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मंदिरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षेसाठी संस्थांचे गार्ड तैनात असतील अशी माहिती व्यवस्थापक डफळ यांनी दिली.

तगडा पोलिस बंदोबस्त

जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी मंदिर परिसरामध्ये तगडा बंदोबस्त तैनात ठेवला आहे. त्यात पोलिस उपअधीक्षक, निरीक्षक तीन, सहायक निरीक्षक दोन, उपनिरीक्षक १८, कॉन्स्टेबल ११०, होमगार्ड १००, क्यूआरटी पथक, बीडीडीएस पथक आदींचा समावेश असेल, असे निरीक्षक झुंजारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT