आमदार संतोष बांगर sakal
मराठवाडा

Hingoli : बाळापुरात संतोष बांगर यांचा नागरी सत्कार

विविध विकास कामांचे भूमिपूजन

राजेश नागरे

आखाडा बाळापूर : येथे आमदार संतोष बांगर यांचा नागरी सत्कार करण्यात आला; तसेच त्यांच्या विकास निधीतून मंजूर झालेल्या १३ कोटी ५० लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन मंगळवारी (ता. २८) आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भीमाबाई नरवाडे होत्या. माजी शिक्षण सभापती संजय बोढारे, मोहनसिंग बायस, राजेश्वर पतंगे, राजेंद्र शिखरे, धनंजय पाटील सूर्यवंशी, विजय पाटील बोढारे, सचिन पेंढारकर, रामभाऊ कदम, रुहुलाखा देशमुख, बाजीराव सवडकर, पप्पू पाटील अडकिने, शिवा उघडे, शेषराव बोढारे, संदीप नरवाडे यांच्यासह परिसरातील नेते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्ता पाटील बोंढारे यांनी केले होते.

यावेळी आमदार बांगर म्हणाले, ‘‘आमचा ध्यास फक्त विकास कामे करायचा आहे. आम्हाला माघारी कोण काय म्हणतो याकडे मी लक्ष देत नाही. आम्ही फक्त विकास कामाकरिता निधी आणतो; कारण लोकसभेचा खासदार आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती बाळापूरचा सरपंच हे सर्व आपले आहेत. शिवसेनेचे आहेत. यामुळे आपण कोणाच्याही टीकेला भीक घालत नसून केवळ विकासकामे करण्याकरिता अग्रेसर आहे’’, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarfaraz Khan Century: कसोटी संघातून वगळले, त्या सर्फराजने खणखणीत शतक झळकावून निवड समितीला उत्तर दिले

Nashik Water Supply : इंदिरानगरची पाण्याची समस्या सुटणार; जलवाहिनी टाकण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाची परवानगी

मराठी लोकांचा वरण भात म्हणजे गरीब शेतकऱ्यांचं जेवण... विवेक अग्निहोत्रीच्या वक्तव्यावर भडकले नेटकरी; म्हणतात- या गाढवाला...

Stock Market Closing: सेन्सेक्स 676 अंकांच्या वाढीसह बंद; ऑटो, रिअल्टी आणि मेटल क्षेत्रात जोरदार खरेदी

Nashik Air Pollution : नाशिकमध्ये वाहनांचा धूर जीवघेणा; प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT