aundha sakal
मराठवाडा

Hingoli : विरोधकांना संपविण्याचे भाजपचे षडयंत्र ; सातव

आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी भाजपवर कडाडून टीका केली

राजेश नागरे

औंढा नागनाथ : सत्तेसाठी हापापलेल्या भाजपने विरोधकांना संपविण्यासाठी नैतिक पातळी सोडली असून, षडयंत्र रचले आहे. पण, सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही, असे प्रतिपादन करताना भाजप सरकारने कितीही चौकशा आणि आरोप लावले तरीही सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे निर्दोष आहेत, हेच सिद्ध होईल. असा विश्वास आमदार प्रज्ञाताई सातव यांनी व्यक्त केला.

सोनिया गांधी यांची ईडीमार्फत होत असलेल्या चौकशीच्या निषेधार्थ बुधवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने औंढा नागनाथ येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी भाजपवर कडाडून टीका केली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या विरोधात ईडीचा वापर करून गेल्या दोन दिवसांपासून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम भाजप करीत आहे. परंतु, या दबावाला आम्ही कधीही बळी पडणार नाहीत. या देशाच्या लोकशाहीसाठी संपूर्ण काँग्रेस पक्ष आणि जनता सोनिया गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भाजपने कितीही शक्ती लावली तरी सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी आम्ही कायम उभे आहोत, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष मुनीर पटेल यांच्यासह नगरसेवक अज्जु इनामदार अजीज कादरी, सुरेश जावळे, अरुणा देशमुख, स्वाती वाखरकर, केशवराव नाईक, विलास गोरे, नगरसेविका कुंताबाई गोबाडे, युवक काँग्रेस अध्यक्ष बालाजी कर्डिले, काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष सुमेध मुळे, बाळू देशमुख, पंकज जाधव, विक्की देशमुख, भोलासिंग दरोगा, संतोष साबळे, विठ्ठल जाधव, अक्षय डाखोरे, बंडू काळे, ज्योती धुळे, फारुख पठाण, शेख अनिस, मारोती शिंदे, संभाजी बेले, प्रवीण सरकटे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coastal Road BMW Accident : फ्लायओव्हरवरून थेट खाली कोसळली कार, १७ ते २५ वर्षीय ३ तरुणांचा जागीच मृत्यू; काय घडलं?

99 पर्सेंटाइलच्या वादानंतर सरकारचा मोठा निर्णय! आता इंजिनिअरिंग-फार्मसी प्रवेशासाठी बारावीचे मार्कही मोजणार

लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत काळाचा घाला! एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी हंबरडा फोडला; म्हणाले 'मॅनेजमेंट...'

Marathi News Live Updates : शिरूर गोळीबाराची घटना ताजी असतानाच सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून तरूणावर जीवघेणा हल्ला

RASHID KHAN: राशिद खानला कर्णधारपदावरून हटवलं, पण बातमीच मिळाली नाही? म्हणाला- ‘मलाही...’; अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT