Hingoli BJP Yuva agitation against MSEB sakal
मराठवाडा

हिंगोली : महावितरणच्या विरोधात रास्ता रोको

प्रमुख मागणीसाठी भाजप युवा मोर्चातर्फे रास्ता रोको आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : कानडखेडा बुद्रूक येथील ३३ केव्हीचे केंद्र सुरू करावे, या प्रमुख मागणीसाठी भाजप युवा मोर्चातर्फे सोमवारी कनेरगाव नाका (ता. हिंगोली) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भाजप युवा मोर्चा लातूर जिल्हा प्रभारी तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. दरम्यान, महावितरणचे अधिक्षक अभियंत्यांनी ३० जून पर्यंत कानडखेडा बुद्रूक येथील ३३ केव्ही केंद्र सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.

यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार तथा जिल्हा अध्यक्ष रामराव वडकुते, भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष पप्पू चव्हाण, भाजप तालुका अध्यक्ष संतोष टेकाळे, ॲड. अमोल जाधव, शंकरराव पाटील, डॉ. भानुदास वामन, माणिक लोडे, गजानन नायक, रामेश्वर भालेराव, किसनराव गावंडे, रामचंद्र पाटील, शिवाजी वैद्य, रामेश्वर भालेराव, सरपंच, समाधान पठाडे, गजानन भालेराव, दिलीप भालेराव, रामकिशन पठाडे, गणेश गावंडे, प्रशांत कंधारकर, मनोज सोळंके, शंकर वामन, अमोल बागले, गोपाल मुधळकर, वैभव जुनगरे, दत्तराव मुटकुळे, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump यांचा मोठा निर्णय! व्हिसा मुलाखती अनिश्चित काळासाठी स्थगित; अमेरिकेच्या प्रवासाची तयारी करणाऱ्या लाखो अर्जदारांना फटका

आजचे राशिभविष्य - 26 ऑगस्ट 2026

विशेष : सागरी क्षेत्रात करिअरच्या संधी

भविष्यवेध : एआय, डेटा सायन्स, मशिन लर्निंग की सीएस आयटी?

Startup Stipend Scheme: स्टार्टअप सुरू करण्याची मोठी संधी; दरमहा १५ हजारांचे मानधन, ७.५ लाखांची मार्केटिंग मदत, पेटेंट खर्चही सरकार देणार

SCROLL FOR NEXT