file photo 
मराठवाडा

Hingoli Breaking ; सतरा वर्षीय युवक, बारा वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : मुंबईहून परतलेल्या सतरा वर्षीय पुरुषासह एका बारा वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी (ता.एक) सायंकाळी पाचच्या सुमारास प्राप्त झाला. जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता ७७ वर पोहचल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. मुंबईवरून सोमवारी परतलेला एक १७ वर्षीय युवक औंढा तालुक्यातील असून अन्य एक रुग्ण मुंबईहून वसमत येथे परतलेली एका बारा वर्षीय मुलगी आहे. या दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

मुंबईवरून सोमवारी परतलेला एक १७ वर्षीय रुग्ण औंढा तालुक्यातील असून त्याला औंढा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये भरती केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे मुंबईहून वसमत येथे परतलेल्या एका बारा वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाल्याने तिला वसमत येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये भरती केले असून उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - Good News ; हिंगोलीत कोरोना तपासणी लॅब, ट्रू नेट मशीन होणार उपलब्ध

जिल्ह्यात एकूण १८२ रुग्ण
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १८२ रुग्ण झाले असून त्यापैकी १०५ रुग्ण ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना घरी सुट्टी देण्यात आली. तर आजमितीला एकूण ७७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर कोरोना सेंटर येथे उपचार सुरु असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले.

हेही वाचा - हिंगोली जिल्‍ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी -

जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली
जिल्ह्यात मुंबई, पुणे येथून परतणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मुंबईवरून परतणाऱ्यांना कसे रोखता येईल याकडे आरोग्य विभागासह ग्रामपंचायत पातळीवरील कृती शीघ्र दलासमोर मोठे आव्हान उभे टाकले आहे. जर असेच नागरिक मुंबई, पुणे येथून जिल्ह्यात परत असतील तर आणखी काही दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सध्या बाहेर जिल्ह्यातील येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Crisis: होर्मुझ बंद तर जग ठप्प! कच्च्या तेलाचे दर २०० डॉलरवर जाण्याची भीती, जागतिक मंदीचे संकट गडद

Karad South Politics: भोसले पिता-पुत्रांची बाजार समितीला भेट; ‘कृष्णा’च्या निवडणुकीने कऱ्हाड दक्षिणची गणिते बदलण्याची चिन्हे

Maharashtra Rain: मेघगर्जनेसह धो-धो कोसळणार! 'या' 5 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

PM Modi Gold Appeal : मोदींच्या आवाहनानंतर सोन्यातील गुंतवणूक थांबली? साडेतीन मुहूर्ताच्या तोंडावर ग्राहकांनी सराफ बाजाराकडे का फिरवली पाठ?

Latest Marathi News Live Update : सी बी आयकडून पुण्यात तिघांची चौकशी सुरू, बँक खात्यांसह संपर्कातील व्यक्तींचाही तपास

SCROLL FOR NEXT