file photo 
मराठवाडा

हिंगोली : बसवर दगडफेक प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

राजेश दारव्हेकर

हिंगोली : राज्य परिवहन मंडळाच्या बिलोली ते अकोला जाणाऱ्या बसवर अज्ञात व्यक्तीने समोरील काचावर दगड फेकून पंधरा हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी बस चालकाच्या फिर्यादीवरून  गुरुवारी ( ता. चार ) रात्री उशिरा शहर पोलिसात गुन्हा दाखल  झाला आहे.

या बाबत माहिती अशी की, नांदेड जिल्ह्याची बिलोली ते अकोला बस क्रमांक ( एमएच १४ बीटी ३०५०) बिलोली आगराची बस गुरुवारी (ता. चार)  सायंकाळी हिंगोली येथील  बसस्थानककडे जात असताना शहरातील तापडिया  इस्टेट गेटसमोर आली असताना  समोरून एक अनोळखी व्यक्तीने दारूच्या नशेत विनाकारण बसवर दगड फेकून  समोरील काचेचे नुकसान केले.

यात सुमारे पंधरा हजाराचे नुकसान झाल्याचे चालकाने सांगितले. त्या व्यक्तीस बसमध्ये बसवून थेट चालकाने गाडी पोलिस ठाण्यात आणून लावली. पोलिसांनी त्यास नाव गाव विचारले असता त्याने गौतम गोविंदा मोरे राहणार वाशिम असे नाव सांगितले.सादर व्यक्तीने बसवर दगड मारून बसचे अंदाजे पंधरा हजार रुपयांचे नुकसान केल्या प्रकरणी चालक दत्तात्रय घुगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे जागतिक शेअर बाजारात भूकंप, 'या' कंपन्यांचे शेअर्स गडगडले

Manoj Jarange Patil: सातारा गॅझेट लागू न झाल्यास पुन्हा आंदोलन: मनोज जरांगे पाटील, सात तारखेपर्यंत सकारात्मक निर्णय अपेक्षित!

Sahyadri tiger reserve update : ‘सह्याद्री प्रकल्प’मध्ये ‘शिलेदार’ची एन्ट्री, ‘तारा’सोबत जमणार का जोडी? निसर्गप्रेमींसाठी उत्सुकता

Israel-Iran war: इस्त्राईल–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल-डिझेल संपणार; अफवांमुळे पंपांवर वाहनधारकांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरण : नाशिकमधील डॉ. अमोल पाटीलला पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT